भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाला (GDP) कृत्रिम बुद्धिमत्तेने (Artificial Intelligence) २.५ ने चालना मिळेल
- नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज् (NASSCOM) व इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (ICRIER) व गूगल (Google) यांचा संयुक्त अहवाल ‘Implications on AI (Artificial Intellegence) on Indian Economy’ प्रकाशित झाला.
- या अहवालात भारताच्या जीडीपीमध्ये AI चा तीव्र अवलंब केल्याने २.५% वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
- परंतु जीडीपीमधील सकारात्मक वाढीचा धक्का ट्रिगर करण्यासाठी AI च्या तीव्रतेत झपाट्याने वाढ केली जाणे आवश्यक आहे.
- या अहवालात नमूद केल्याप्रमाणे AI कार्यक्रमात केंद्रीय अर्थसंकल्पातील ७०,००० कोटी गुंतवणुकीमुळे आणखी गुंतवणूक आकर्षित होईल. (२०१९ मध्ये ७६२.५ दशलक्ष डॉलर्स आकर्षित केले.)
- त्यामुळे AI ची तीव्रता अंदाजे १.३ पट वाढेल परिणामी जीडीपीमध्ये ३.२% किंवा ८५.७० अब्ज डॉलरची वाढ होईल.
या धोरणासाठी शिफारसी :
- १. AI च्या विकास व प्रसारासाठी नोडल एजन्सी तयार करणे.
- २. सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्थेतील गुंतवणुकीसाठी सहयोगात्मक फ्रेमवर्क तयार करणे.
- रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारताच्या GDP मध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था विस्कळित झाल्यामुळे नकारात्मक वाढ होईल व अत्यंत अनिश्चित महागाई असल्याचे नमूद केले.
- निर्यातदारांच्या सर्वोच्च संस्थेने (फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन – FIEO) चालू आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत २०% नी घसरण असेल, असे सांगितले. जिचे मूल्य ५०-६० अब्ज डॉलर्स असेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता :
- औपचारिक सुरुवात १९५०च्या दशकात झाली.
- ही संगणकशास्त्रातील महत्त्वाची संज्ञा असून यात यंत्रशिक्षण, त्यांचे बुद्धिमान वर्तन आणि परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता इत्यादीचा अभ्यास केला जातो.
- मात्र हे संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशीच निगडित आहे.
- AI प्रणाली ही अर्थशास्त्र, आरोग्यविज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी शाखांमध्ये वापरली जाते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व :
- निती आयोगाच्या अंदाजानुसार भारतात AI योग्य पद्धतीने अवलंबल्यास २०३५ पर्यंत अर्थव्यवस्थेच्या सकल मूल्यवर्धनात (GVA) १५% ने वाढ होईल.
- दर्जेदार आरोग्य सेवांसाठी, कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी, शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो.