भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र (आयएएमसी)

भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र (आयएएमसी)

  • १८ डिसेंबर २०२१ रोजी, भारताचे सरन्यायाधीश एन व्ही. रामन्ना, आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, यांनी नानकरामगुडा, हैदराबाद, तेलंगणा येथील फिनिक्स व्हीके टॉवर येथे भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे (आयएएमसी) उद्घाटन केले.
  • पुरेशा न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी सदर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 
  • व्यावसायिक वाद-विवाद तसेच सामान्य लोकांच्या समस्यांकडे सुद्धा हे केंद्र लक्ष देईल.
  • पारंपरिक न्यायालयापेक्षा लवादाचे फायदे म्हणजे कमी विलंब, कमी खर्च आणि न्यायिक प्रक्रियेत पक्षांचा अधिक सहभाग हे आहेत.
  • त्यामुळे प्रकरणांचा जलद निपटारा होणे सुलभ होणार आहे.
  • केंद्राला राज्य, केंद्र आणि इतर आशियाई देशांचे सहकार्य मिळणार आहे.

एन व्ही. रामन्ना :

  • भारताचे ४८वे सरन्यायाधीश (२४ एप्रिल २०२१ ते २६ ऑगस्ट २०२२)
  • आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम येथे २७ ऑगस्ट १९५७ ला शेतकरी कुटुंबात जन्म
  • भारताचे सरन्यायाधीश होणारे आंध्रप्रदेश मधील दुसरे व्यक्ती (पहिली व्यक्ती : न्या. के. सुब्बाराव -१९६६ ते १९६७)
  • रामन्ना हे मार्च ते मे २०१३ दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
  • तसेच २०१३ आणि १४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
  • नोव्हेंबर २०१९पासून ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (NALSA) कार्यकारी अध्यक्ष होते.
  • तसेच त्यांनी इनाडू या तेलुगु वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून देखील काम केले आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now