भारताचा क्षयरोग अहवाल,२०२०

भारताचा क्षयरोग अहवाल,२०२०

  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राज्य आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राष्ट्रीय क्षयरोग अहवाल प्रसिद्ध केला.
  • या अहवालानुसार भारतातील क्षयरोग होणार्‍या व्यक्तींची संख्या २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये १४% ने वाढलेली दिसून आली. भारतात २०१९ सालात एकूण २४.०४ लाख आढळून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०३० पर्यंत क्षयरोग संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर भारताने २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोग संपवण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखले आहे.

महत्त्वाचे:

  • जागतिक क्षयरोग दिन : २४ मार्च
  • २०२० थीम: It’s Time

राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम (भारत) : TB हारेगा, देश जितेगा

  • नि-क्षय प्रणाली अंतर्गत भारतातील क्षयरोग बाधित व्यक्तींना आर्थिक, वैद्यकीय सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच दर चार महिन्याला केंद्रसरकार नि-क्षय पत्रिका प्रसिद्ध करणार असून पुढील राष्ट्रीय कार्यक्रम आखणार आहे.
  • या अहवालानुसार गुजरात, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांनी उत्तम कामगिरी केल्याचे म्हटले आहे. तसेच वैद्यकीय उपचारापासून वंचित राहिलेल्या क्षयरोग्यांची संख्या २०१७ मध्ये १० लाख तर २०१९ मध्ये २.९ लाख होती.
  • खासगी क्षयरोगाची चाचणी करणार्‍यांची संख्या देखील ३५%ने वाढलेली दिसते. तसेच बालकांच्या चाचण्या आणि त्यांचे क्षयरोगापासून निदान यात भारताने २०१८ च्या तुलनेत २% ने प्रगती केली आहे.

Contact Us

    Enquire Now