भारताचा ऑलिम्पिंकमधील प्रवास

भारताचा ऑलिम्पिंकमधील प्रवास

  • टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा २०२१,२३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान पार पडली. यामध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण ७ पदके जिंकली. त्यात एक सुवर्ण, २ रजत, ४ कांस्य पदक पटकावली.
  • भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवास, तुलनात्मक अभ्यास तसेच खेळाडूंबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
 • ऑलिम्पिकचा इतिहास
  • प्राचीन काळी ऑलिम्पिक हा खेळ ग्रीसची राजधानी अथेन्स येथे खेळला जात असे. हा खेळ माऊंट ऑलिम्पियावर खेळला जात असल्यामुळे त्याला ऑलिम्पिक हे नाव पडले.
  • या स्पर्धेमध्ये विजेत्याला शिल्पाचे पारितोषिक दिले जात असे.
  • इ.स.पू. ७७६ मध्ये सुरू झालेला हा खेळ त्यानंतर युद्धांमुळे खंडित झाला.
  • आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धा १८९६ मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स येथेच भरवण्यात आली.
  • आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्याचे सर्व श्रेय जाते ते फ्रान्सचे पियर डी कुबर्टिन यांना. त्यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानले जाते.
  • ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.
 • ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रकार
  • १९९२ सालापर्यंत चार वर्षातून एकदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हाेत असे. परंतु या नंतर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक असे विभाजन करण्यात आले.
  • या स्पर्धांमध्ये २ वर्षांचे अंतर असते. म्हणजे टोकिओ ऑलिम्पिक २०२० नंतर २०२२ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक बीजिंग येथे भरवण्यात येईल.
  • पॅरालीम्पिक स्पर्धा 
  • दिव्यांग खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन १९४८ पासून करण्यात येऊ लागले. विशेष म्हणजे ज्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच देशात पॅरालिम्पिक स्पर्धा घेतल्या जातात. म्हणजेच पॅरालिम्पिक २०२० च्या स्पर्धा टोकिओ मध्ये २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ मध्ये पार पडतील.
  • हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांना फारशी प्रसिद्धी न मिळाल्याने उन्हाळी ऑलिम्पिकच मुख्य मानल्या जातात.
 • ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतिक
  • खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले ५ रंगांचे ५ वर्तुळ
  • निळे वर्तुळ – युरोप खंड
  • पिवळे वर्तुळ – आशिया खंड
  • काळे वर्तुळ – आफ्रिका खंड
  • हिरवे वर्तुळ – ओशिनिया खंड
  • लाल वर्तुळ – अमेरिका खंड
 • स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा ऑलिम्पिकमधील सहभाग
  • सर्वप्रथम सहभाग – १९०० पॅरिस ऑलिम्पिक
  • र्स्पधक – १, नॉर्मन प्रिचर्ड (भारतात जन्म, ब्रिटिश अधिकाऱ्याचा मुलगा)
  • २ पदके (२०० मी शर्यत – रौप्य २०० मी अडथळ्यांची शर्यत – रौप्य)
  • त्यानंतर १९२८ पर्यंत भारताला एकही पदक मिळविता आले नाही.
  • १९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अम्सटर्डममध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावलं. त्या संघात हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचा समावेश होता.
  • १९३२ मध्ये लॉस अँजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने पुन्हा सुवर्णपदकाची कामगिरी केली. या स्पर्धेदरम्यान भारताने अमेरिकेचा २४-१ अशा गोलफरकाने पराभव केला.
  • १९३६ मध्ये बर्लिन स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जर्मनीला ८-१ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
  • त्यानंतर १९४० (टोकिओ) आणि १९४४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.(१९१६ मध्येही ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली होती.)
 • स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी (१९४८-२०२१)
 • १९४८ – लंडन ऑलिम्पिक स्पर्धा( १ पदक)
  • भारताने या स्पर्धेत आपले ७९ स्पर्धक पाठवले.
  • भारत पहिल्यांदाच एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून सहभागी झाला.
  • भारताने हॉकीमध्ये पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली.
 • १९५२ – हेलसिकी ऑलिम्पिक स्पर्धा(२ पदके)
  • भारतीय हॉकी संघाचे दुसरे सुवर्णपदक
  • कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावले त्यांना कुस्ती स्पर्धेत कास्यंपदक मिळाले.
 • १९५६ – मेलबॉर्न ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघाचे तिसरे सुवर्ण पदक
 • १९६० – रोम ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघाला रजत पदक अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून २-१ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला.
 • १९६४ – टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा १-० फरकाने पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.
 • १९६८ – मेक्सिको ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव (२-१)
  • कांस्यपदकाची कमाई
 • १९७२ – म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघांची कांस्यपदकाची कमाई
 • १९८० – मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारतीय हॉकी संघाची सुवर्णपदकाची कमाई
  • त्यानंतर भारतीय हॉकी संघाला २०२१ पर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंता आले नाह.
  • १९८० ते १९९६ पर्यंत भारत एकही पदक जिंकू शकला नाही.
 • १९९६ – अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारताच्या लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
  • भारताला टेनिसमध्ये मिळालेले एकमात्र पदक
 • २००० – सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
  • ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला.
 • २००४ – अँथेस ऑलिम्पिक स्पर्धा(१ पदक)
  • भारताचे नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर यांनी मेन्स डबल ट्रॅप शुटींगमध्ये रजत पदक पटकावले.
  • नेमबाजीतील हे भारताचे पहिले पदक
 • २००८ – बीजिंग ऑलिम्पिंक स्पर्धा (३ पदके)
  • भारताचे अभिनव बिंद्रा यांचे नेमबाजीत पहिले सुवर्णपदक. वैयक्तिकरीत्या भारताचे पहिले सुवर्णपदक
  • कुस्तीपटू सुशीलकुमार यांना कांस्यपदक
  • मुक्केबाज विजेंद्रसिंह यांना कांस्यपदक
 • २०१२ – लंडन ऑलिम्पिक स्पर्धा (६ पदके)
  • नेमबाज विजयकुमार यांनी जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रजत पदक पटकावले.
  • नेमबाज गगन नारंग यांनी १० मीटर्स एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले.
  • कुस्तीपटू सुशील कुमार यांनी ६६ किलो वजनी गटात रजत पदक पटकावले.
  • कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी ६० किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
  • बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉक्सर मेरीकोम यांनी कास्यपदक पटकावले.
 • २०१६ – रियो ऑलिम्पिक स्पर्धा (२ पदके)
  • महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ५८ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
  • बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधून महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावले.
 • २०२० टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा (७ पदके)
  • कालावधी – २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ (कोविड महामारीमुळे ही स्पर्धा १ वर्ष उशिराने आयोजित करण्यात आली.)
  • शुभंकर – मिराईतोवा
  • बोधचिन्ह – बुद्धीबळपट
  • नवीन खेळ – थ्री बाय थ्री बास्केटबॉल, मॉडिसन सायकलिंग, बीएमएक्स
  • उद्घाटक ध्वजवाहक-एम.सी. मेरी कोम आणि  मनप्रीत सिंग.
  • समारोप ध्वजवाहक- बजरंग पुनिया
 • पदके-
 • नीरज चोप्रा – सुवर्ण पदक
  • भालाफेक स्पर्धेत ८७.५८ मी. भाला फेकून भालाफेक प्रकारात पहिले सुवर्ण पदक.
  • भारताचे ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक
  • बीजिंग ऑलिम्पिक २००८ नंतर हे भारताचं पहिलं गोल्ड मेड.
  • २०१६- सुवर्णपदक,दक्षिण आशियाई स्पर्धा
  • २०१७- सुवर्णपदक,आशियाई एथलेटिक्स स्पर्धा
  • २०१८-सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धा
  • २०१८- सुवर्णपदक, आशियाई क्रीडा स्पर्धा
  • २०१८- अर्जुन पुरस्कार.
 • मीराबाई चानू – रौप्य पदक – (वेटलिफ्टिंग)
  • ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई
  • पहिल्याच दिवशी पदककमाईचा दुर्मिळ योग
  • त्यांनी स्नॅच प्रकारात ८७ किलो तर क्लीन आणि जर्क प्रकारात ११५ किलो म्हणजेच २०२ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला.
  • कर्णम मल्लेश्वरी यांनी २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे.
  • २०१७-सुवर्णपदक,जागतिक अजिंक्यपद स्पर्धा
  • दोन राष्ट्रकुल पदके (२०१४-रौप्य, २०१८-सुवर्ण) 
  • २०१९-आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदक
  • २०१८- पद्मश्री
  • २०१८- मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
 • पी. व्ही. सिंधू : कांस्यपदक (बॅडमिंटन)
  • २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
  • सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
  • बॅडमिंटनमध्ये (सिंधू २०१६, २०२१ आणि सायना नेहवाल २०१२) भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे तिसरे पदक ठरले.
  • २०१३- अर्जुन पुरस्कार
  • २०१५- पद्मश्री पुरस्कार
  • २०१६-मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
  • २०२०- पद्मभूषण
 • लोवलिना बार्गोहेन – कांस्यपद (बॉक्सिंग)
  • महिलांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक 
  • विजेंदर सिंग (२००८) व मेरी कोम (२०१२) यानंतरचे बॉक्सिंगमधील तिसरे पदक
  • २०१८ -कांस्यपदक जागतिक अजिंक्यपद स्पर्धा.
  • २०२०- अर्जुन पुरस्कार
 • भारतीय पुरुष हॉकी संघ – कांस्यपदक
  • जर्मनीचा ५-४ असा पराभव
  • ४१ वर्षानंतर मिळवले पदक
  •  मॉस्को-१९८० ऑलिम्पिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक
 • बजरंग पुनीया – कांस्यपदक (कुस्ती)
  • कझाकस्तानच्या कुस्तीपटू डॉलेटचा (८-०) असा पराभव
 • रवी दहिया – रौप्यपदक (कुस्ती)
  • कुस्तीपटू सुशीलकुमारनंतर रौप्यपदक पटकावणारा दुसरा कुस्तीपटू
  • ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या झॅव्हूरकडून (७-४) असा पराभव
 • विशेष:
 • ऑलिम्पिक स्पर्धाच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम.
 • ऑस्ट्रलियाची महिला जलतरणपटु एमा मैकिअनचा ७ पदकांचा विश्वविक्रम
 • ऑलिम्पिकमधील भारताचे कुस्तीमध्ये आत्तापर्यंत ७ पदके
 • अमेरिका ३९ सुवर्णपदकांसह अव्वल.
 • भारत पदतालिकेत ४८ व्या स्थानी.
 • यापुढील ऑलिम्पिक २०२४ मध्ये पॅरिस येथे होतील.

Contact Us

  Enquire Now