भारताचा अर्थसंकल्पीय अधिवेशन – २९ जानेवारीपासून
- संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCPA) अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.
- यावर्षीचे अधिवेशन दोन टप्प्यांत होणार आहे.
- २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी – पहिला टप्पा
- ८ मार्च ते ८ एप्रिल – दुसरा टप्पा
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता ८ एप्रिलला होणे अपेक्षित आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद २९ जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित करतील.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामण हे केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत मांडतील.
- कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे.