भारताकडून जल्लीकट्टू या मल्ल्याळी चित्रपटाची ऑस्करसाठी निवड
- यंदाच्या ९३व्या ऑस्कर पुरस्कारासाठी जल्लीकट्टू या मल्ल्याळी भाषिक चित्रपटाच्या अधिकृत प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
- जल्लीकट्टू हा ऑस्करसाठी निवडलेला गुरू (१९९७) व अबू, सन ऑफ आदाम (२०११) यानंतरचा तिसरा मल्ल्याळ चित्रपट आहे.
ठळक बाबी :
- ऑस्करच्या परदेशी भाषा चित्रपट जल्लीकट्टू चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
- फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या १४ सदस्यीय समितीने २७ चित्रपटांमधून ‘जल्लीकट्टूची’ निवड केली आहे.
- या चित्रपटाचे दिग्दर्शन लिजो जोस पोलिसरी हे आहेत.
- हा चित्रपट केरळ/तमिळनाडूच्या पोंगल सणानिमित्ताने आयोजित ‘जल्लीकट्टू’ या पारंपरिक खेळावर आधारित असून या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.
ऑस्करविषयी थोडक्यात :
- सोहळ्याचे ठिकाण : डॉल्बी थिएटर (लॉस एंजेलिस, कॉलिफोर्निया)
- आवृत्ती : ९३वी (२५ एप्रिल, २०२१)
- पुरस्कार देणारी संस्था : अॅकॅडमी मोशन पिक्चर आर्टस् अँड सायन्स (AMPAM)
- प्रथम पुरस्कार सोहळा : १९२९
- भारतातील पहिला ऑस्करसाठी नामांकित हिंदी चित्रपट – मदर इंडिया (१९५७)
- ऑस्करसाठी नामांकित भारतीय चित्रपट :
- मदर इंडिया (१९५७),
- सलाम बॉम्बे (१९८८),
- लगान (२००१)
ऑक्सर विजेते भारतीय व्यक्ती :
क्र. व्यक्ती वर्ष चित्रपट/ गाणे क्षेत्र/इतर माहिती
१) भानू अथैया १९८३ गांधी सर्वोकृष्ट वेशभूषा – १६ ऑक्टोबर, २०२० रोजी निधन
२) सत्यजित रे १९९२ – – सिनेसृष्टीतील योगदान – पाथेर पांचाली, अपराजितो, द वर्ल्ड अपू हे उत्कृष्ट संग्रह
३) ए. आर. रहमान २००९ स्लमडॉग मिलेनिअर सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर
जय हो ओ साया सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग
४) गुलजार २००९ जय हो सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग
५) रेसुक्त पुकुट्टी २००९ स्लमडॉग मिलेनिअर सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग