भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- पात्रता – शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे ७/१२ असणे आवश्यक असून जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे किंवा जमीन कुळकायद्याखाली येत असल्यास कुळांचे संमतीपत्र आवश्यक परंपरागत वननिवासी अधिनियम २००६ नुसार वनपट्टेधारक शेतकरी
- क्षेत्र मर्यादा
प्रदेश | किमान क्षेत्र | कमाल क्षेत्र |
१) कोकण | ०.१० हेक्टर | १० हेक्टर |
२) उर्वरित महाराष्ट्र | ०.२० हेक्टर | ६ हेक्टर |
- अनुदान मर्यादा : लाभार्थीस १०० टक्के अनुदान देय आहे. अनुदान तीन वर्षांच्या कालावधीस प्रथम वर्ष ५० टक्के, दुसरे वर्ष ३० टक्के तर तिसरे वर्ष २० टक्के
फलोत्पादन यांत्रिकीकरण योजना :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘हॉर्ननेट’ या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान क्षेत्र विस्तार
- विविध फळपिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असून त्यातून शेतकरी आणि शेतकऱ्यांचा गट यांचा सामूहिक विकास करणे.
कृषी पायाभूत सुविधा योजना
- कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग
- कालावधी २०२०-२१ ते २०२९-३०
- कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याकरिता १ लाख कोटी रुपयांची तरतूद
- लाभार्थी – प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संख्या कृषी उद्योजक, स्टार्टअप आणि केंद्र/राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प
- स्वरूप : २ कोटी मर्यादेपर्यंतच्या कर्जावर वार्षिक ३ टक्के व्याज सवलत असेल. ही सवलत ७ वर्षांपर्यंत असते.