ब्रिटनमध्ये ‘सीरम’चा भव्य गुंतवणूक प्रकल्प

ब्रिटनमध्ये ‘सीरम’चा भव्य गुंतवणूक प्रकल्प

  • आदर पूनावाला यांची ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ब्रिटनमध्ये तब्बल 33 कोटी 40 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
  • सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असून सध्या ॲस्ट्राझेनेकाची कमी किमतीची कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत आहे. 
  • ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेतील चाचण्या, संशोधन, लसीची निर्मिती, विक्री कार्यालय आणि संभाव्य उत्पादन असे प्रकल्पाचे स्वरूप असेल. 
  • विक्री कार्यालयामुळे एक अब्जच्या घरातील नवा व्यवसाय निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • या प्रकल्पामुळे कोरोना तसेच इतर प्राणघातक साथींवर मात करण्याच्या ब्रिटनच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
  • भारताबाहेरील ब्रिटनच्या एक अब्ज पौंड रकमेच्या व्यापार आणि गुंतवणुकीच्या व्यापक कराराचा हा एक भाग असेल.
  • या प्रकल्पामुळे साडे सहा हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
  • ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने भारताबरोबरील भागीदारीला प्राधान्य दिले आहे.

Contact Us

    Enquire Now