ब्रिटनच्या न्यायालयाने असांज यांच्या प्रत्यर्पणाची विनंती फेटाळली

ब्रिटनच्या न्यायालयाने असांज यांच्या प्रत्यर्पणाची विनंती फेटाळली

 • विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ब्रिटनच्या न्यायालयाने दिला.
 • अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली असांज यांच्या प्रत्यर्पणाची मागणी सातत्याने अमेरिकेकडून होत असे.
 • ब्रिटनचे डिस्ट्रिक्ट जज वनेसा बराइस्टर प्रत्यर्पणाचा अर्ज अमान्य करत म्हणाले की असांज यांची मानसिक परिस्थिती बरी नसल्याने ते आत्महत्या करण्याची शक्यता आहे.
 • दशकभरापूर्वी लष्करी व राजनैतिक कागदपत्राबाबत संगणकाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
 • या आरोपासाठी १७५ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
 • या आधी असांज यांच्यावर स्विडनमधील अत्याचारप्रकरणी दिलासा मिळाला होता.
 • या प्रकरणातून वाचण्यासाठी इक्वेडोर दूतावासात आश्रमात होते.
 • असांज पेशाने पत्रकार होते व इराक व अफगाणिस्थानात अमेरिकेच्या गैरकृत्याचे पर्दाफाश करणारी कागदपत्रे प्रकाशित केली.
 • या प्रकरणात त्यांना कलम १९ (१) यान्वये भाषण स्वातंत्र्यान्वये संरक्षण मिळण्यास पात्र आहेत, असा असांज यांचे वकील म्हणाले.
 • अमेरिका सरकार या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे म्हटले आहे.

ज्यूलियन असांज

 • जन्म – ३ जुलै १९७१ ऑस्ट्रेलिया
 • व्यवसाय – विकिलिक्सचे संस्थापक, पत्रकार
 • पुरस्कार – २००८ – Economist Freedom of Expression Award
 • २००९ – अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ब्रिटेन मीडिया पुरस्कार
 • २०१० – सॅम अॅडम्स पुरस्कार

Contact Us

  Enquire Now