ब्रिक्स यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा

ब्रिक्स यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा

  • ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही चीनने दर्शविली आहे.

ब्रिक्सविषयी

  • ब्रिक्स (BRICS) हे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यानंतर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.
  • गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन अभ्यास करून आपले प्रमेय मांडले आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. गोल्डमन सॅकने या चार राष्ट्रांनी काय करावे हे कधीच सुचवले नाही वा त्यावर भाष्य केले नाही. परिणामत: जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी चार राष्ट्रे परस्परांजवळ येत गेली. २००८ साली चार राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री प्रथमच एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकड वाटली म्हणून १६ जून २००९ रोजी चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या येकाटरीनबर्ग येथे संपन्न झाली. विशेष गोष्ट म्हणजे ब्रिकची चारही राष्ट्रे जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या व प्रगती पथावर असणाऱ्या राष्ट्रांची अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत. जगाच्या भूमीच्या जवळपास ४० टक्के भूमी ब्रिक्स राष्ट्रसमूहाची आहे.
  • आतापर्यंतच्या ब्रिक्स परिषदा

 

क्रमांक वर्ष देश शहर
१) २००९ रशिया येकाटरिनबर्ग
२) २०१० ब्राझिल ब्राझिलीया
३) २०११ चीन सान्या
४) २०१२ भारत नवी दिल्ली
५) २०१३ दक्षिण आफ्रिका डर्बन
६) २०१४ ब्राझिल फोर्टालिझा
७) २०१५ रशिया उफा
८) २०१६ भारत बेनौलिम (गोवा)
९) २०१७ चीन झियामेन
१०) २०१८ दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग
११) २०१९ ब्राझिल ब्राझिलिया
१२) २०२० (आभासी पद्धतीने १७ नोव्हेंबर) रशिया सेंट पीटर्सबर्ग
१३) २०२१ भारत दिल्ली

 

Contact Us

    Enquire Now