ब्राझीलच्या अध्यक्षांनी मानले भारताचे आभार

ब्राझीलच्या अध्यक्षांनी मानले भारताचे आभार

  • भारताने पाठवलेले कोरोना लसीचे २० लाख डोस ब्राझीलला मिळाल्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जेट बोल्सोनारो यांनी भारताचे आभार मानले.
  • बोल्सोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाच्या चित्रासह ‘जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे’ असे ट्विट केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवले.
  • भारताने कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलने लसीची मागणी केली होती. तिला सकारात्मक प्रतिसाद देत भारताने ब्राझीलला लस पुरवण्यास सुरुवात केली.
  • भारतातून लसीचे डोस साझो पावलो येथे प्रथम पोहोचले, तेथून ते रिओ दि जानिरो येथील फिओक्रझ संस्थेत पाठविण्यात आले आहेत.
  • त्याचबरोबर अमेरिकेला आणि जगातील अनेक देशांना कोविड-१९ लस भेट दिल्याबद्दल अमेरिकेने भारताला ‘सच्चा मित्र’ असे संबोधून भारताची प्रशंसा केली. भारताने भूतान, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, सेशेल्स या देशांना कोरोनाची लस पाठवली आहे.

Contact Us

    Enquire Now