बेसल 3 तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर
- 29 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने कोविड संकटाशी निगडित अनिश्चिततेमुळे तिसऱ्या बेसल भांडवलाखाली केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकली.
- या संदर्भात RBI कॅपिटल कन्झर्व्हेशन बफर (CCB) आणि नेट स्टेबल फंडिंग रेशो (NSFR)ची अंमलबजावणी सहा महिन्यांपर्यंत म्हणजे 1 एप्रिल, 2021 पर्यंत रद्द करेल.
कॅपिटल कन्झर्व्हेशन बफर (CCB) :
- हे एक अतिरिक्त टूल आहे जे सामान्य काळात बँक तयार करतात आणि ताणतणावाच्या काळात बँक त्याचा वापर करते.
- RBI ने टप्प्याटप्प्याने आवश्यक असणाऱ्या 2.5% CCB तयार करण्यास बँकांना सांगितले आहे.
- 0.625% चा शेवटचा टप्पा 30 सप्टेंबर, 2020 रोजी सुरू होणार होता. तो आता 1 एप्रिल 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आला.
- RBI ने यापूर्वी ही अंमलबजावणी 31 मार्च 2020 पासून 6 महिन्यांनी पुढे ढकलली होती.
नेट स्टेबल फंडिंग रेशो (NSFR) :
- NSFR म्हणजे वर्षभर मागणीपेक्षा जास्त पुरवठा राहील एवढी संपत्ती.
- वर्षभर मागणीपेक्षा जास्त पुरवठा होऊ शकेल एवढी संपत्ती बँकांकडे असली पाहिजे.
- म्हणजे NSFR 100% पेक्षा जास्त असला पाहिजे.
- विहित मुदतीनुसार बँकांना 1 एप्रिल 2020 पासून NSFR ची 100% देखभाल करणे आवश्यक होते, परंतु आता RBI ने दुसऱ्यांदा ते 1 एप्रिल 2021 पर्यंत पुढे ढकलले.