बेंगळुरू बनत आहे ई-वाहन निर्मितीचे हब

बेंगळुरू बनत आहे ई-वाहन निर्मितीचे हब

  • जगातील सर्वात मोठी आणि जगप्रसिद्ध इलक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ बेंगळुरूमध्ये कारनिर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे.
  • इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीसाठी अनेक राज्यांनी पायघड्या पसरल्या असल्या तरी सर्वांना मागे टाकत कर्नाटकने बाजी मारली आहे.
  • गेल्या काही वर्षांमध्ये कर्नाटकमध्ये इलेक्टिक वाहनांबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी बेंगळुरूच्या आसपास उत्पादन, तसेच संशोधन प्रकल्प उभारले आहेत.
  • मस्क यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विट करून ‘टेस्ला’ २०२१ मध्ये भारतात पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ‘टेस्ला’च्या आगमनाची घोषणा केली.
  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित असे स्वतंत्र धोरण तयार करणारे कर्नाटक हे देशातले पहिले राज्य होते. ई-वाहनांसाठी आवश्यक असलेली उपकरणे, बॅटरी तसेच सुटे भाग निर्मिती करणाऱ्यांसाठी या धोरणातून प्रोत्साहन देण्यात आले आहे.
  • बेंगळुरू आणि जवळपासच्या परिसराचा विचार केला तर आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी तिचे प्रकल्प थाटले आहेत. मर्सिडीज बेन्झ, व्हॉल्वो, जनरल मोटर्स इत्यादी कंपन्यांचे संशोधन आणि विकास प्रकल्प याच परिसरात आहेत.
  • बेंगळुरूमध्ये तब्बल इलेक्ट्रिक वाहनांचे ४५ स्टार्टअप प्रकल्प सुरू झाले आहेत. अथर एनर्जी, महिंद्रा इलेक्ट्रिक यासारख्या ई-वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रकल्प बेंगळुरूमध्ये आहेत.

Contact Us

    Enquire Now