बुद्धदेव दासगुप्ता

बुद्धदेव दासगुप्ता

जन्म – ११ फेब्रुवारी, १९४४ (पुरुलिया) (पश्चिम बंगाल)

मृत्यू – १० जून, २०२१ (कोलकाता)

जीवन परिचय

 • प्रख्यात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
 • दासगुप्ता यांनी एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली.
 • १९७० च्या दशकात कलकत्ता फिल्म सोसायटीचे सदस्य म्हणून नाव नोंदवल्यानंतर ते चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरले.
 • १९७८ सालचा ‘दूरत्व’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
 • कवी, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला.
 • नीम अन्नपूर्णा, गृहयुद्ध, बाघ बहादुर, चराचर, लाल दर्जा, उत्तरा, स्वप्नेर दिन, कालपुरुष असे त्यांचे गाजलेले चित्रपट
 • ‘अंधी गली’, आणि ‘अन्वर का अजब किस्सा’ या हिंदी चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
 • त्यांना त्यांच्या कार्यकीर्दीत १२ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
 • बुद्धदेवांच्या पारितोषिकविजेत्या चित्रपटाची यादी मोठी आहे, त्यांना ‘लाल दर्जा, चराचर आणि ‘कालपुरुष’ या तीन चित्रपटांना सर्वोत्कृष्ट राष्टीय पुरस्कार मिळाले होते.
 • ‘उत्तरा’ आणि ‘स्वप्नेर दिन साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले.
 • जानेवारी २०१९ मध्ये कोलकाता येथे आयोजित केलेल्या समारोहात पश्चिम बंगाल फिल्म पत्रकार संंघातर्फे त्यांना सत्यजित रे लाईफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

Contact Us

  Enquire Now