बीएसएफच्या कार्यक्षेत्रात बदल
- केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या सीमेवरील पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील सीमा सुरक्षा दलाचे (BSF) कार्यक्षेत्र १५ किमीवरून ५० किमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन निर्णयामुळे झालेले बदल :
- बीएसएफला सीमेवरील मोठ्या भूभागावर शोधमोहिम, छापेमारी, अटक, जप्ती अशा कारवाई करणे शक्य होणार आहे.
- देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५० किमीवर आता बीएसएफचे नियंत्रण असेल.
- तसेच गुजरातमधील कार्यक्षेत्र ८० किमीवरून ५० किमीपर्यंत मर्यादित केले आहे.
सीमा सुरक्षा दल अधिनियम १९६८ :
- कलम १३९ – केंद्र सरकारला वेळोवेळी सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र आणि परिचालन अधिसूचित करण्याचे अधिकार देते.
- कलम १३९ (१) अंतर्गत तरतुदी देशातील बारा सीमावर्ती राज्यांवर या बदलाचा थेट परिणाम ईशान्येकडील पाच राज्यांत तसेच जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये बीएसएफ कोठेही कारवाई करू शकेल.
सीमा सुरक्षा दल (Border Security Force) :
- स्थापना – १ डिसेंबर १९६५
- पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या सीमेवर भारताची सीमा रक्षक संस्था.
- बीएसएफचे स्वत:चे अधिकारी संवर्ग असतात मात्र त्याचे महासंचालक हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असतात.
बीएसएफला त्याच्या अधिकार क्षेत्रात पुढील कायद्यानुसार अधिकार प्राप्त होतात :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३
२) पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०
३) पासपोर्ट कायदा, १९६७
४) एनडीपीएस कायदा, १९८५
५) शस्र कायदा, १९५९
६) सीमा शुल्क, १९६२
सीमांवर भेडसावणाऱ्या समस्या
अ) अतिक्रमण
ब) बेकायदेशीर घुसखोरी
क) ड्रग्ज व गुरांची तस्करी