‘बिट्टू’ हा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत; जलीकट्टू बाहेर

‘बिट्टू’ हा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत; जलीकट्टू बाहेर

 • ऑस्करच्या शर्यतीतून ‘जलीट्टू’ हा चित्रपट बाहेर पडला असला तरी एकता कपूर निर्मित ‘बिट्टू’ या लघुपटाने ऑस्करसाठी घोडदौड कायम ठेवली आहे. या लघुपटाने पहिली फेरी पार केली आहे.
 • प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता मिळवूनही मल्याळी चित्रपट ‘जलीकट्टू’ला १५ सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत नामांकन मिळू शकले नाही. दरम्यान करिष्मा दुबे दिग्दर्शित ‘बिट्टू’ या लघुपटाची पटकथा आणि अभिनय सरस ठरल्यामुळे हा लघुपट स्पर्धेत लोकप्रिय ठरला आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करून हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.
 • यंदाचा हा ९३वा ऑस्कर पुरस्कार सोहळा २५ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी १५ मार्चला अंतिम नामांकन जाहीर करण्यात येतील. या सोहळ्यासाठी जगभरातून ९३ चित्रपटांना नामांकन मिळाले होते.
 • ‘बिट्टू’ ची निर्मिती एकता कपूर, ताहिरा कश्यप, आणि गुणीत मोंगा या तिघांनी केली आहे. ‘इंडियन वूमन रायझिंग’ अंतर्गत हा आमचा पहिला प्रकल्प असून तो खूप खास असल्याचे त्यांनी सांगितले.
 • विद्यार्थिनी असलेल्या करिष्मा देव-दुबेने या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून ऑस्करमध्ये पोहोचण्यापूर्वी हा लघुपट १८ विविध चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अनेक पुरस्कारही त्याने पटकावले आहेत.
 • या लघुपटात आरोही पटेल, मौलिक नायक, मेहुल सोळंकी, हेमांग शाह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी काम केले आहे.
 • या लघुपटाची कथा ही वास्तवाशी निगडित आहे. एकमेकींवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन जिवलग मैत्रिणी यात आहेत. एके दिवशी शाळेत दोघींवर विषप्रयोग केला जातो. या घटनेनंतर ही कथा नाट्यमय वळण घेते. यामधील कलाकारांच्या अभिनयाने या लघुपटाची चर्चा जगभरात होत आहे. त्यामुळे ‘बिट्टू’ हा लघुपट ‘लाइव्ह ॲक्शन लघुपटा’च्या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ऑस्कर पुरस्काराविषयी थोडक्यात

 • सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा पुरस्कार
 • सुरुवात – १९२९ (अमेरिका)
 • २०२१ – ९३ वे वर्ष
 • कोरोना पार्श्वभूमीवर २ महिने पुढे ढकलला.
 • आता २८ फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल २०२१ ला होईल.
 • पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ (१९३८, १९६८, १९८१, २०२१.

२०२० चे पुरस्कार (९२वा)

 • ९ फेब्रुवारी २०२०, लॉस अँजेलिस, अमेरिका
 • सर्वाधिक नामांकने – जोकर चित्रपट (११)
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट (दक्षिण कोरिया)
 • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – पॅरासाइट (दिग्दर्शक – बाँग-जून-हो)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता – जोक्किन फिनिक्स (जोकर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- रिनी झेलवेगरला(ज्युडी)
 • सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर – ‘टॉय स्टोरी 4’.

Contact Us

  Enquire Now