बिटकॉइनच्या मागे टेस्ला कंपनीचे पाठबळ

बिटकॉइनच्या मागे टेस्ला कंपनीचे पाठबळ

  • जगातील श्रीमंत व प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी बिटकॉइनमध्ये दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली.
  • त्यामुळे बिटकॉइन्सचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले आहे. ही चलनातील आतापर्यंतची सर्वोच्च वाढ
  • या चलनाचे मूल्य ४४ हजार डॉलर्स वर गेले आहे.
  • इलेक्ट्रिक मोटारींची खरेदी करणाऱ्याकडून बिटकॉइनच्या स्वरूपात पैसे स्वीकारण्यात येतील अशी घोषणा टेस्लाने केली आहे.
  • बिटकॉइन्सच्या किंमतीत वाढ झाली असली तरी हा फुगा लवकरच फुटेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इतर कंपन्यांची गुंतवणूक

  • मायक्रोस्ट्रेटजी या कंपनीने १.१ अब्ज डॉलर, तर स्क्वेअर कंपनीने ५ कोटी डॉलर्स
  • बिटकॉइन हे आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बिटकॉइन – आभासी चलन

  • आभासी चलन म्हणजे ‘विनियमित, संगणकीय पैसा जो विशिष्ट विकासक नियंत्रित करतात व ज्याची स्वीकृती विशिष्ट सदस्यांपर्यंतच मर्यादित असते.
  • बिटकॉइन डिजिटल आभासी चलन आहे. इंटरनेटचा वापर करून बिटकॉइनचा व्यवहार करता येतात.
  • यावर कोणत्याही केंद्रीय संस्थेचे नियंत्रण नसते.
  • व्यवहारांच्या संख्येवरून Ledger नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरवते.
  • ऑगस्ट २०१३ अखेर जगात Bitcoin ने होणाऱ्या व्यवहारांची संख्या १.५ बिलियन गेली होती.

Bitcoin चे फायदे व तोटे

फायदे

  • व्यवहारात सुलभता
  • पारदर्शक व्यवहार
  • क्रयशक्तीचे सुरक्षित हस्तांतरण

तोटे

  • मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार Bitcoin ने शक्य होत नाहीत.
  • मर्यादित व्यवहारामुळे Bitcoin च्या किमतीत जास्त चढउतार
  • Bitcoin साठीचे वापरलेले तंत्रज्ञान अपुरे कारण, Bitcoin ला लागणारे तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत करावे लागते.
  • पुढे काय होईल अंदाज बांधणे कठीण कारण Bitcoin चा खेळ विशिष्ट सदस्यांच्या ‘स्वीकृती’वर चाललेला आहे.

Contact Us

    Enquire Now