बांबूच्या प्रजातीला डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव
- ज्येष्ठ पर्यावरण डॉ. माधव गाडगीळ यांच्या पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव म्हणून बांबूच्या मेस प्रजातीला ‘सुडो ओक्सीनानथेरा माधवी’ असे नाव देण्यात आले आहे.
- पानशेत शिरकोली जंगलात ही वनस्पती प्रजाती सापडली आहे. पुण्यातील वनस्पती संशोधकांनी ती शोधून काढली आहे. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. पी. तेताली, केरळच्या वन संशोधन केंद्राचे डॉ. मुरलीधरन, आघारकर संशोधन संस्थेतील शास्रज्ञ डॉ. मंदार दातार, डॉ. सुजाता तेताली, सारंग बोकील, डॉ. रितेश चौधरी यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे.
- या संशोधनासंबंधीचा शोध निबंध ‘फायटोटॉक्सा’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. बांबूला त्याच्या आयुष्यात एकदाच फुले येतात. फुलाशिवाय बांबूच्या प्रजीतीची ओळख निश्चित करणे अवघड असते. ४० ते ६० वर्षांनी बांबूचे बेट मरते.
- बांबूला आतापर्यंत मेस आणि माणगा या दोन्ही प्रजातींसाठी ‘सुगेओक्सीनानथेरा स्टॉकसी’ हे एकच शास्रीय नाव असल्याने गोंधळ होत होता. डॉ. पी. तेताली यांनी अनेक वर्षांच्या निरीक्षणाने फुलांच्या माध्यमातून या दोन प्रजातींमधील फरक निश्चित केला आहे.
- यामधील मेस प्रजातीचे नव्याने नामकरण करण्यात आले असून डॉ. गाडगीळ यांचे नाव दिले आहे. त्यामुळे बांबूच्या या दोन प्रजाती वेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- सह्याद्रीमधील वनस्पतींमध्ये बांबूच्या प्रजातीने भर घातली असून जैवविविधतेमध्ये पूर्ण योगदान दिले आहे. मेस या बांबूचा वापर बांधकामात केला जातो. कारण हा बांबू खूप मजबूत असतो.
- घरे फर्निचर बनविण्यासाठीही याचा वापर होतो. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जंगलात हा बांबू दिसून येतो.
डॉ. माधव धनंजय गाडगीळ थोडक्यात
- जन्म – २४ मे १९४२ (पुणे)
- शिक्षण – पुणे, मुंबई, हार्वर्ड विद्यापीठ (Ph.D मॅथेमॅटिकल इकॉलॉजी)
- पेशा – जीवशास्त्रज्ञ (गाडगीळ आयोग प्रसिद्ध)
- पुरस्कार – पद्मश्री
- शांतीस्वरूप भटनागर विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार
- पद्मभूषण
- विक्रम साराभाई पुरस्कार
- हार्वर्ड सेंटेनिअल पदक
- पर्यावरणातील कामगिरीबद्दल टायलर पुरस्कार
- एच. के. फिरोदिया पुरस्कार.
- संशोधनाचे विषय – लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण
- डॉ. माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वत भागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे अध्यक्ष होते. भारतातल्या ‘पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन’ या कल्पनेचे ते जनक आहेत.