बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) – २०२१

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) – २०२१

 • संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रकल्प (UNDP – United Nations Development Programme) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी २०२१ सालचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI – Multidimensional Poverty Index) जाहीर केला.
 • या निर्देशांकात १०७ देशांमध्ये भारत ६२वा क्रमांकावर आहे.

महत्त्वाचे

 • MPI प्रकाशन – UNDP आणि OPHI ६×Ford poverty and Human Development Initiative)
 • कधी प्रकाशित होतो? – दरवर्षी जुलै २०२१ला सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाला.
 • सुरुवात – २०१० पासून
 • किती देशांचे मुल्यांकन करण्यात येते – २०२१ साली – १०९ देश 
 • आयाम व निर्देशांक – ३ आयाम = (अ) आरोग्य (ब) शिक्षण (क) राहणीमान
 • १० निर्देशांक – 

(अ) आरोग्य – (i) पोषण (ii) बालमर्त्यता

(ब) शिक्षण – (i) शालेय वर्षे (ii) बालक पटसंख्या

(क) राहणीमान – (i) मालमत्ता (ii) वीज (iii) पाणी (iv) स्वच्छतागृह (v) स्वयंपाक इंधन (vi) जमीन

भारताचा २०२१च्या अहवालातील क्रमांक – ६२

अहवालातील काही महत्त्वाचे

 • १०७ देशांतील १.३ अब्ज लोक तीव्र बहुआयामी दारिद्र्यात
 • त्यापैकी ८५% लोक सहारन आफ्रिका किंवा दक्षिण आशियामध्ये राहतात.
 • भारतातील ६ पैकी ५ बहुआयामी गरीब व्यक्ती अनुसूचित जाती अथवा जमातीमधील आहे.
 • वरील आयाम व निर्देशांकांच्या सहाय्याने प्रथम बहुआयामी गरीब कुटुंबांची संख्या शोधली जाते. त्यावरून दारिद्र्याची तीव्रता व गरीब व्यक्तींचे प्रमाण काढून या दोन्ही मापकांचा गुणाकार काढला जातो. यावरून मिळणारे निष्कर्ष म्हणजेच MPI असतो.
 • त्यानुसार ३३.३३ टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना बहुआयामी गरीब म्हणतात तर ३३.३३% ते २०% अभाव असेल तर हा गट असुरक्षित गटात असेल.
 • ५० टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना तीव्र बहुआयामी गरीब मानले जाते.

Contact Us

  Enquire Now