बर्ड फ्‍लू

बर्ड फ्‍लू

 • राजस्थान, केरळ, पंजाब, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात बर्ड फ्‍लू रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
 • हिमाचल प्रदेश – बर्ड फ्‍लू रोगाचा HSN1 स्ट्रेनमुळे कांगडा जिल्ह्यातील पोंग धरण क्षेत्रात सायबेरिया आणि मंगोलियातून स्थलांतरीत डोक्यावर दोन पट्ट्या असणाऱ्या बदकांचा मृत्यू झाला आहे.
 • मध्यप्रदेश – इंदूर शहरात १४८ कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यातील दोन कावळ्यांचे नमुने भोपाळला पाठवले असता बर्ड फ्‍लूचे निदान झाले. मध्यप्रदेश सरकारने दक्षिणेकडील राज्यांतून चिकन आयातीस बंदी केली आहे.
 • राजस्थान – झालावाड, .बाराक, जयपूर व कोटा जिल्ह्यात कावळ्यांच्या मृत्यूशिवाय २०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू
 • केरळ – अलापुझ्झा आणि कोट्टायम या दोन जिल्ह्यांत बर्ड फ्‍लूच्या HSN8 स्ट्रेनमुळे ३६००० पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. केरळ सरकारने या रोगास राज्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे.

बर्ड फ्‍लूविषयी (एव्हिएन इन्फ्‍लूएन्झा)

 • हा आजार HSN1 किंवा HSN8 या व्हायरसमुळे होतो.
 • मुख्यत: हा विषाणू बदके, कोंबड्या, मोर आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो.
 • अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग क्षेत्रात वाढ होऊन मानवालाही लागण होऊ शकते.
 • १९९७ मध्ये माणसांतल्या संसर्गाचे पहिले प्रकरण हाँगकाँगमध्ये आढळले होते, मात्र भारतात एकही प्रकारची अशी घटना आढळली नाही.

बर्ड फ्‍लूची लक्षणे

 • यामुळे न्यूमोनिया किंवा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDs) होण्याची शक्यता असते.

इतर लक्षणे

 1. दम लागणे.
 2. घशात खवखवणे.
 3. ताप वाढणे.
 4. अंगदुखी
 5. पोटदुखी
 6. छातीत दुखणे.

काळजी कशी घ्यावी ?

 • मास्क घालणे अनिवार्य
 • स्वच्छ ठिकाणांहून मांसाहार खरेदी करावा.
 • WHO नुसार मांस, अंडी, चिकन किमान ७० अंश सेल्सिअस तापमानावर व्यवस्थित शिजवून खावीत.
 • सोसायटीत येणाऱ्या पक्ष्यांना अन्न टाकणे बंद करावे.

बर्ड फ्‍लूसाठी राज्य महाराष्ट्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

 • सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्‍लूबद्दल माहिती द्यावी.
 • पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
 • संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद.
 • बर्ड फ्‍लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
 • जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
 • पक्षी, कावळे किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.

Contact Us

  Enquire Now