फसव्या कर्जदात्या ॲप्सना गूगलने ‘प्ले स्टोअर्स’ वरून हटवले

फसव्या कर्जदात्या ॲप्सना गूगलने ‘प्ले स्टोअर्स’ वरून हटवले.

  • व्यक्‍तिगत कर्ज देणाऱ्या फसव्या ॲप्सद्वारे मागील काही दिवसांपासून सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गूगलने सुरक्षा धोरणांचे उल्लंघन करत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ॲप्सना ‘गूगल प्ले स्टोअर्स’ मधून हटविले आहे.
  • गूगलने मात्र कोणकोणत्या ॲप्सना प्ले स्टोअर्सवरून हटविण्यात आले हे जाहीर केले नाही. परंतु अशा ॲप्सची संख्या १००हून अधिक असल्याचे सांगितले आहे.
  • तसेच इतर ॲप्स डेव्हलपर्सना ते भारतात लागू असलेल्या कायद्याच आणि नियमांचं पालन करतात, हे दाखविण्याचे सांगितले. असल्याच कंपनीने म्हटले आहे. हे दर्शविण्यात अपयशी ठरलेल्या ॲप्सना पुढील कोणतीही सूचना न देता काढून टाकण्यात येईल असा इशारा ही गूगलने दिला असल्याच प्रॉडक्ट, अँड्रॉइड सिक्युरिटी आणि प्रायव्हसीच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी सांगितलं.
  • त्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अशा ॲप्सच्या प्रकरणांची चौकशी करण्यास मदत करू, असंही फ्रे म्हणाल्या.
  • फसव्या ॲपपासून सावधगिरीत्या कर्ज कालावधी हा प्रमुख निकष आहे असे या क्षेत्रातील ८५ तंत्रस्नेही व्यासपीठाच प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘डिजिटल लेंडर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएलएआय) ने म्हटले आहे.
  • अत्यल्प कर्जाचा मुदत कालावधी म्हणजे ३० दिवसांपेक्षा कमी तसेच अधिक व्याजदर विलंब शुल्क अशी व्यूहरचना करून सर्वसामान्य ग्राहकांना फसव्या ॲपद्वारे फसवण्याचा प्रयत्न असतो.
  • आता या सर्व प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने नियामक उपाय सुचविण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. डिजिटल कर्जवितरणाच्या क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँक शिफारसी करणार आहे.
  • कर्ज वितरण करणाऱ्या ऑनलाईन व्यासपीठांची लोकप्रियता वाढवणे व त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही येत असून, त्यापासून सावधगिरी बाळगली जावी असेही रिझर्व्ह बँकेने पत्रक काढून सांगितले आहे.

Contact Us

    Enquire Now