प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम २०२१ सरकारकडून अधिसूचित
- एकदाच वापरात येणार्या प्लॅस्टिकला २०२२पर्यंत टप्प्याटप्प्याने हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने, एकल वापराच्या, निश्चित केलेल्या प्लॅस्टिक वस्तूंना प्रतिबंध करणारे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम २०२१ अधिसूचित केले आहेत. २०२२पर्यंत, कमी उपयोगाच्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा करणार्या एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंना प्रतिबंधित करणारा हा नियम आहे.
- एकल वापराच्या प्लॅस्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कृती करण्याकरिता भारत कटिबद्ध आहे. २०१९मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चौथ्या पर्यावरण सभेत एकल वापराच्या प्लॅस्टिक उत्पादनामुळे होणार्या प्रदूषणासंदर्भात ठराव मांडला होता. या अतिशय महत्त्वाच्या विषयाची जागतिक समुदायाने तातडीने दखल घ्यावी असा याचा उद्देश होता. या ठरावाचा या सभेत स्वीकार हे महत्त्वाचे पाऊल होते.
- १ जुलै २०२२पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरीनसह एकल-उपयोगाच्या खालील प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि उपयोग प्रतिबंधित करण्यात येईल.
- प्लॅस्टिक काडी असलेल्या ईअरबड्स, फुगे, झेंडे, कॅण्डी आणि आईसक्रीम्सना असलेल्या प्लॅस्टिक काड्या, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरीन [थर्माकोल];
- प्लेट, कप, पेले, काटे-चमचे, सुरी, स्ट्रॉ, मिठाईच्या खोक्याभोवती, निमंत्रण पत्रिकेभोवती, सिगारेट पाकिटाभोवती गुंडाळण्यात येणारी फिल्म, १०० माइक्रोन्सपेक्षा कमी जाडीची प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टरर.
- हलक्या वजनाच्या प्लॅस्टिक थैल्यांमुळे निर्माण होणारा कचरा थांबवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१पासून प्लॅस्टिक थैल्यांची जाडी ५० मायक्रोन्सवरून वाढवून ७५ मायक्रोन्स तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रोन्स करण्यात आली आहे. जाडी वाढवल्याने या थैलीचा दुसर्यांदा उपयोग शक्य होणार आहे.
- विस्तारित निर्माता उत्तरदायित्वाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या संदर्भातल्या मार्गदर्शक तत्त्वांना प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम २०२१द्वारे कायद्याचे पाठबळ देण्यात आले आहे. एकल वापर प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार उपाययोजना करत आहे.
- एकल वापराच्या प्लॅस्टिकला कल्पक पर्याय तसेच प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी डिजिटल तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता इंडिया प्लॅस्टिक चलेंज- हॅकेथॉन २०२१ आयोजित करण्यात आले असून स्टार्ट अप इंडिया उपक्रमांतर्गत स्टार्ट अप्स आणि उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.