प्रसिद्ध संगीतकार ‘नरेंद्र भिडे’ यांचे निधन

प्रसिद्ध संगीतकार ‘नरेंद्र भिडे’ यांचे निधन

  • मराठी नाटके, चित्रपटे, मालिकांना आपल्या संगीताचा साज देणारे संगीतकार नरेंद्र भिडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • त्यांनी उस्ताद महंमद हुसेन खाँ, स्वरराज छोटा संघर्ष यांच्यांकडे शास्त्रीय संगीताचे व हेमंत गोडबोले यांकडे पाश्चिमात्त्य संगीताचे शिक्षण घेतले होते.
  • नाटक, मालिका, चित्रपट, जाहिरातींना (जिंगल्स) संगीत देत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली.
  • त्यांनी झी गौरव (५ वेळा), सह्याद्री सिने पुरस्कार, राज्य नाट्य पुरस्कार (२ वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

संगीत दिलेल्या मालिका

  1. अवंतिका
  2. ऊन पाऊस
  3. घरकुल
  4. मानो या ना मानो 
  5. भूमिका
  6. पेशवाई 
  7. अमरप्रेम

संगीत दिलेली नाटके

  1. कोण म्हणतं टवका दिला ?
  2. माकडाच्या हाती शॅम्पेन
  3. काटकोन त्रिकोण
  4. चांदणे शिंपीत जा
  5. जोडी तुझी माझी

चित्रपट

  1. मुळशी पॅटर्न
  2. देऊळ बंद
  3. साने गुरुजी
  4. रमा माधव
  5. एलिझाबेथ एकादशी
  6. हरिश्चंदाची फॅक्टरी
  7. सरसेनापती हंबीरराव (आगामी चित्रपट अखेरचा ठरला)

Contact Us

    Enquire Now