प्रलंबित खटले आणि हंगामी न्यायाधीश

प्रलंबित खटले आणि हंगामी न्यायाधीश

  • देशातील उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या खटल्यांची प्रचंड संख्या लक्षात घेऊन नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने काही निवृत्त न्यायाधीशांना हंगामी (Ad hoc) न्यायाधीश म्हणून नियुक्‍त करण्यात यावे असे प्रतिपादन केले व त्यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्या पुढीलप्रमाणे,
  • एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील खटले खूप वर्षे (साधारणत: ८ ते १० वर्षे) प्रलंबित असल्यास संबंधित उच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश एखाद्या निवृत्त न्यायाधीशास हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्‍त करू शकतो.
  • हे हंगामी न्यायाधीश सर्वात कनिष्ठ (संबंधित उच्च न्यायालयात) समजल्या जातील.
  • विशिष्ट अधिकारक्षेत्रातील त्या न्यायाधीशाच्या अनुभवाच्या आधारावर नियुक्‍ती करावी.

प्रलंबित खटल्यांची संख्या एवढी प्रचंड का?

  • करांचे खटले अनेक लोकांनी शासनावर लादले आहेत. त्यामुळे कोर्टात सर्वात मोठा याचिकादार शासन आहे.
  • बजेटमध्ये न्यायव्यवस्थेसाठी जीडीपीच्या केवळ ०.०८% ते ०.०९% एवढीच तरतूद आहे.
  • कायदे बनवताना त्याचा न्यायव्यवस्थेवर होणारा परिणाम शासन लक्षात घेत नाही.
  • कॉलेजियम पद्धतीने न्यायाधीशांची नियुक्‍ती करण्यात होणारा विलंब.
  • देशामध्ये असणाऱ्या २५ उच्च न्यायालयांमध्ये एकूण १०८० न्यायाधीशांची जागा आहे. परंतु सध्या केवळ ६६१ न्यायाधीश कार्यरत असून ४१९ जागा रिक्त आहेत.

घटनात्मक तरतुदी :

सर्वोच्च न्यायालय :

  • सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) हे राष्ट्रपतींकडून नियुक्‍त केले जातात.
  • तसेच इतर न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी व सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत करून राष्ट्रपतींद्वारे नियुक्‍त केल्या जातात.
  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संसद कायद्याद्वारे ठरवते. (सध्या CJI सहित ३४ न्यायाधीश आहेत.)

उच्च न्यायालय :

  • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपतींद्वारा नियुक्‍त केले जातात. परंतु राष्ट्रपतींना CJI व संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घ्यावा लागतो.
  • उच्च न्यायालयाच्या इतर (मुख्य न्यायाधीश सोडता) न्यायाधीशांची नियुक्‍ती राष्ट्रपतीच (CJI, संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेऊन) करतात.
  • उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवतात.
  • अशा नियमित न्यायाधीशांव्यतिरिक्‍त इतर कारणांसाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये हंगामी, अतिरिक्‍त आणि प्रभारी न्यायाधीशांच्या नियुक्‍तीची तरतूद घटनेत आहे. आपण पुढील तक्त्यांच्या माध्यमातून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करू.
सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय
अ) प्रभारी सरन्यायाधीश/Acting CJI

  • कलम १२६
  • नियुक्‍ती राष्ट्रपती करतात.
  • सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशांची खालील कारणास्तव प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नियुक्‍ती होते.

१) CJI चे पद रिक्‍त

२) CJI गैरहजर असल्यास

३) आपल्या पदाची कार्ये करण्यास CJI असमर्थ असल्यास

अ) प्रभारी सरन्यायाधीश/Acting Chief Justice

  • कलम २२३
  • नियुक्‍ती राष्ट्रपती करतात.
  • उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची खालील कारणास्तव प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नियुक्‍ती होते.

१) सरन्यायाधीशाचे पद रिक्‍त असल्यास

२) सरन्यायाधीश गैरहजर असल्यास

३) आपल्या पदाची कार्ये करण्यास सरन्यायाधीश असमर्थ असल्यास

ब) हंगामी न्यायाधीश/Ad Hoc Judge

  • कलम १२७
  • सर्वोच्च न्यायालयात गणपूर्तीची (Quorum) कमतरता असल्यास उच्च न्यायालयातील न्यायाधीशास (की जो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्र असेल) हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्‍त करता येते.
  • नियुक्‍ती – राष्ट्रपती व संबंधित उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या संमतीने CJI नियुक्‍ती करतात.
ब) अतिरिक्‍त (Additional) आणि प्रभारी (Acting) न्यायाधीश

  • कलम २२४
  • नियुक्‍ती – अतिरिक्‍त व प्रभारी या दोघांची नियुक्‍ती राष्ट्रपती करतो.

अ) अतिरिक्‍त (Additional) न्यायाधीश 

  • उच्च न्यायालयामध्ये कामाचा बोझा तात्पुरता वाढल्यास २ वर्षांसाठी नियुक्‍ती

ब) प्रभारी (Acting) न्यायाधीश

  • उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्‍त जर एखादा न्यायाधीश त्याची कार्ये करण्यास असमर्थ असेल किंवा एखादा न्यायाधीश हा सरन्यायाधीश बनल्यास त्याची जागा घेण्यासाठी
क) निवृत्त न्यायाधीश/Retired Judge

  • कलम १२८
  • उच्च/सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाची नियुक्‍ती CJI, हे राष्ट्रपती व संबंधित निवृत्त न्यायाधीशांच्या पूर्व संमतीने करतात.
  • भत्ते – राष्ट्रपती निर्धारित करतो.
क) निवृत्त न्यायाधीश/Retired Judge

  • कलम २२४A
  • उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाची नियुक्‍ती ही संबंधित उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती व त्या निवृत्त न्यायाधीशाच्या पूर्वसंमतीने करतात.
  • भत्ते – राष्ट्रपती निर्धारित करतो.

 

Contact Us

    Enquire Now