प्रधानमंत्री जन-धन योजनेस सहा वर्षे पूर्ण

प्रधानमंत्री जन-धन योजनेस सहा वर्षे पूर्ण

 • सरकारचे विविध लाभ थेट खात्यात पोहोचण्याच्या हेतून २८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री जन-धन योजना सुरू करण्यात आली.
 • यावर्षी या योजनेस सहा वर्षे पूर्ण झाली.
 • आतापर्यंत एकूण ४०.३५ कोटी खाते या योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

योजनेबद्दल महत्त्वाचे

 • घोषणा – नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी
 • सुरुवात – २८ ऑगस्ट २०१४
 • उद्दिष्टे – दुर्बलघटक आणि अल्पगटातील व्यक्तींना मूलभूत बचत खाते, गरजेवर आधारित कर्ज उपलब्धता धनप्रेषण सुविधा, विमा व पेन्शन सुविधा उपलब्ध करून देणे.

योजनेचे आधार (Pillars)

 • ५ किमीच्या क्षेत्रात बँक सेवा उपलब्ध करून देणे.
 • सर्व कुटुंबांना मूलभूत बँक खाते, ओव्हरड्राफ्ट सुविधा व रुपे डेबिट कार्ड उपलब्ध करून देणे.
 • वित्तीय साक्षरता कार्यक्रम
 • पत हमी निधी
 • सूक्ष्म वित्त
 • पेन्शन योजना

योजनेचा कालावधी

 • वंचित गटांचे सर्वसमावेशक वित्तीय समावेशन १४ ऑगस्ट २०१८ पर्यंत दोन टप्प्यांत साध्य करायचे होते.
 • टप्पा – १ : (१५ ऑगस्ट २०१४ ते १५ ऑगस्ट २०१५) सर्व प्रदेशांना सार्वत्रिक बँक सेवा उपलब्ध करून देणे.
 • टप्पा – २ : (१५ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१८) सहा महिने समाधानकारक चालविल्यानंतर ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा
 • पत हमी निर्माण करणे.
 • स्वावलंबन योजना

Contact Us

  Enquire Now