
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ
- केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) आणखी चार महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.
PMGKAY –
- सुरुवात – एप्रिल २०२०
एकूण पाच टप्पे
- टप्पा – I – एप्रिल ते जून २०२०
- टप्पा – II – जुलै ते नोव्हेंबर २०२०
- टप्पा – III – मे ते जून २०२१
- टप्पा – IV – जुलै ते नोव्हेंबर २०२१
- टप्पा – V – डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२
- योजनेविषयी – ही योजना आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग असून याअंतर्गत कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत गरिबांना मदत करण्यासाठी मोफत अन्नधान्य पुरवण्यात येते.
- फायदे – ८१.३५ कोटींहून अधिक लोकांना प्रति व्यक्ती/ महिना पाच किलो गहू/तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबाला एक किलो चणाडाळ मोफत दिली जातात.
- पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, दिल्ली आणि गुजरात या सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत गहूवाटप करण्यात आले आहे.
- उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांदूळ देण्यात आला आहे.
- हा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत मिळणाऱ्या मासिक लाभांपेक्षा अधिक आहे.
पात्रता –
- दारिद्र्यरेषेखाली कुटुंबे
- अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थी
- प्राधान्य कुटुंब श्रेणी पात्र (PHH)
- सर्व आदिम आदिवासी घरे
- एचआयव्ही पॉझिटिव्ह दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती कुटुंबे
- भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर
- नोडल मंत्रालय – अर्थ मंत्रालय