प्रथमच महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्वावर केशरची लागवड

प्रथमच महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्वावर केशरची लागवड

 • महाराष्ट्राचे मिनी काश्मिर आता स्ट्रॉबेरीबरोबर ‘केशरा’साठीसुद्धा ओळखले जावे याकरिता प्रयत्न सुरु झाले आहेत.
 • कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वरमधील मेत व भूताड या गावात राबविण्यात आला आहे.
 • प्रयोग यशस्वी झाल्यास महत्त्वाचे पर्यायी पीक या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

केशर पिकाकरिता अनुकूल हवामान –

 • केशराकरिता तापमान 100c इतके लागते.
 • जमिन समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार उंचीवर असावे.
 • पर्वतीय (अपरिपक्व) प्रकारची मृदा लागते.
 • केशराकरिता महाबळेश्वरचे वातावरण अनुकूल असल्याने कृषिविभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • जगभरात काश्मिरचे केशर हे उत्कृष्ट केशर म्हणून ओळखले जाते. काश्मिरमधील केशरची स्थानिक वाण (Local Variety) सॅफ्रॉन (Zaffron) आहे..
 • काश्मिरमधील पंपोरे व किरतवाड या भागामध्ये केशरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

केशर उत्पादन करणारे देश-

 • भारत, स्पेन, इराक, फ्रान्स, इटली, तुर्की व चीन येथे केशराची लागवड केली जाते. भारतात फक्‍त काश्मिरमध्येच केशराची लागवड केली जाते.

Contact Us

  Enquire Now