प्रताप मोतीराव वेलकर

प्रताप मोतीराव वेलकर

जन्म – २६ ऑक्टोबर १९२२

निधन – २१ डिसेंबर २०२१

जीवनपरिचय

 • मुंबई महापालिकेचा चालताबोलता इतिहास म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते म्हणजे प्रताप मोतीराव वेलकर यांचे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.
 • वास्तुरचनाकार प्रतापराव हे केवळ शहराच्या वास्तुरचनेशीच नव्हे तर जुन्या काळाशी आधुनिक काळाशी सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व होत.
 • प्रतापरावांचे वडील डॉ. मोतीराव वेलकर हे  ख्यातनाम शल्यचिकित्सक होते.
 • मोतीराव मुंबईतील लोकमान्य टिळकांचे उजवे हात होते.
 • लोकमान्य टिळक जेव्हा व्हॅलेन्टाईन चिरोलवर बदनामीचा खटला दाखल करण्यासाठी इंग्लंडला जाताना त्यांनी मोतीरावांना सोबत नेले होते.
 • प्रतापरावांनी मुंबईच्या इतिहासासंदर्भात व सामाजिक सुधारणा संदर्भात विपुल लेखन केले.
 • त्यांनी लिहिलेल्या पाठारे प्रभूंच्या इतिहासात मुंबईच्या चौपाटीवर उडविण्यात आलेल्या पहिल्या विमानाची हकीगत नोंदवली आहे.
 • इंग्लंडमधून वास्तुरचनेची पदवी
 • मुंबईतील काळबादेवी परिसरातील १९७६ पासूनचे राम मंदिर म्हणजे चापेकर बंधूंच्या मुंबईतील क्रांतिकार्याचे स्मारक असल्याचे त्यांनी एका पुस्तकात नमूद केले आहे.
 • १९५६ पासून ते या मंदिराचे विश्वस्त होते.
 • ‘अव्यक्त लोकमान्य’ आणि ‘तिसरा सावरकर’ ही त्यांची गाजलेली पुस्तके.
 • डॉ. वेलकर यांचा लोकमान्य टिळक या ग्रंथाबद्दल पुण्यात प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या हस्ते आणि य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
 • प्रतापरावांनी पालिकेच्या विविध योजनावर, विकासांवरही लेखन केले.

Contact Us

  Enquire Now