प्रकाशसिंग बादल यांच्याकडून ‘पद्मविभूषण’ परत
- केंद्र सरकारच्या नव्या शेतकरी कायद्यांना विरोध दर्शवीत अकाली दलाचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी त्यांचा पद्विभूषण पुरस्कार परत केला.
- याशिवाय, गेल्या वर्षी देण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा अकाली दलाचे फुटीर नेते व राज्यसभा सदस्य सुखदेवसिंग धिंडसा यांनीही केली.
- यापूर्वी पंजाबमधील काही माजी क्रिडापटूं.नीही त्यांचे पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे.
- पद्मविभूषण पुरस्कार परत करत असल्याचे पत्र पकाशसिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं आहे.
प्रकाशसिंग बादल यांच्याविषयी:
जन्म – 8 डिसेंबर 1927 (अबुल खुराना, पंजाब)
राजकीय पक्ष – शिरोमणी अकाली दल.
- प्रकाशसिंग बादल यांनी 1970-71, 1977-80, 1997-02 आणि 2007-17 असे चार वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
- 1995 ते 2008 या काळात ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष होते.
- त्यानंतर त्यांची जागा मुलगा सुखबीरसिंग बादल यांनी घेतली.
राजकीय कारकीर्द –
- त्यांनी 1947 मध्ये त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.
- 1957 मध्ये ते शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाकडून प्रथमच पंजाब विधानसभेवर निवडून गेले होते.
- 1969 मध्ये ते पुन्हा निवडून आले, त्यांनी सामुदायिक विकास, पंचायती राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री म्हणून काम पाहिले.
- 1972, 1980, 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते.
- 1997च्या निवडणुकीत ते लांबी या विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आणि चार वेळा सलग विजयी राहिले.
- 1977 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीयमंत्री होते, त्यांनी कृषी व पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिले.
- 1970 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर ते भारतातील कोणत्याही राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.
पुरस्कार –
पंथरतन पुरस्कार – 11 डिसेंबर 2011
पद्मविभूषण पुरस्कार – 30 मार्च 2015 (3 डिसेंबर 2020 रोजी परत)
- पद्मविभूषण पुरस्काराबद्दल
- देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- स्थापना-2 जानेवारी 1954
- आत्तापर्यंत 308 जणांना देण्यात आला.
- स्वरूप – पदक आणि प्रशस्तीपत्र