पोचमपल्ली : सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक
- तेलंगणातील पोचमपल्ली गावाची युनायटेड नेशन्स वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेन (UNWTO) द्वारे सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.
- स्पेनमधील माद्रिद येथे डिसेंबर २०२१ मध्ये UNWTOच्या २४व्या महासभेत हा निर्णय घेण्यात आला.
पोचमपल्ली गाव
- तेलंगणातील नळगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली हे गाव ‘इकत’ नावाच्या विशिष्ट शैलीत विणलेल्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावाला भारतातील रेशीमनगरी म्हणूनही संबोधले जाते.
- २००४ मध्ये या इकत शैलीला GI मानांकन प्राप्त झाले.
- आचार्य विनोबा भावे यांनी याच गावापासून १८ एप्रिल १९५१ रोजी भूदान चळवळीला प्रारंभ केला होता.
सर्वोत्तम पर्यटन गाव उपक्रम
- UNWTOच्या या उपक्रमाद्वारे जैवविविधता व सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या गावांना प्रकाशझोतात आणले जाते.
- यामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.
- संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना (UNWTO – United Nations World Tourism Organisation)
- स्थापना – १९७५
- मुख्यालय – माद्रिद, स्पेन
कार्ये – पर्यटनासाठी जागतिक आचारसंहिता लागू करणे, प्रोत्साहन देणे.