पेन पिंटर पुरस्कार, २०२१ – सित्सी दांगरेम्बगा
पेन पिंटर पुरस्कार:
स्थापना – २००९
हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उद्देश-
- जगण्यातले आणि समाजातील सत्य प्रखरपणे मांडणाऱ्या लेखिकांना बळ देण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार दिला जातो.
पात्रता
- आयर्लंड, ब्रिटन, कॉमनवेल्थ किंवा पूर्वीच्या राष्ट्रकुलातील रहिवासी असावा.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती
२०१६ | मार्गारेट अटवुड |
२०१७ | मायकेल लॉगले |
२०१८ | चिमामंदा एनगोझी ॲडिची |
२०१९ | लिंबन सिसी |
२०२० | लिंटन क्वेसी जॉनसन |
२०२१ | सित्सी दांगरेम्बगा |
सित्सी दांगरेम्बगा :
जन्म – १९५९ (झिम्बाब्वे)
- झिम्बाब्वेतील प्रसिद्ध लेखिका, नाटककार, आणि चित्रपट निर्मात्या
- शिक्षण : वैद्यकीय अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मात्र वंशवादामुळे झिम्बाब्वेत परत, तिथे विद्यापीठाच्या नाट्यमंडळात सहभाग
- आफ्रिकन चित्रपटावर पी. एचडी.
- जर्मनीत चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास.
लेखनकार्य-
अ) द लेटर (लघुकथा)
ब) शी नो लाँगर विप्स (नाटक)
क) नर्व्हस कंडिशन (कादंबरी)
ड) डॉटर्स ऑफ आफ्रिका (पुस्तक)
इ) द बुक ऑफ नॉट (कादंबरी)
ई) धिस मोर्नेबल बॉडी (कादंबरी)
चित्रपट–
- ‘नेराय’ नावाच्या चित्रपट कंपनीची स्थापना.
- नेरिया (चित्रपट)
पुरस्कार व सन्मान-
अ) पेन प्रिंटर प्राईझ, २०२१
ब) जर्मन बुक ट्रेडचा पीस प्राईझ
क) नर्व्हस कंडिशन : या कादंबरीस कॉमनवेल्थ लेखक पुरस्कार, BBC च्या २०१८ च्या शंभर पुस्तकांमध्ये सहभाग, आफ्रिकन साहित्यातील मानाचे पान
ड) धिस मोर्नेबल बॉडी – या कादंबरीस बुकर पुरस्कारासाठी नामांकन