पृथ्वीनिरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

पृथ्वीनिरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पृथ्वीनिरीक्षण उपग्रहासह एकूण दहा उपग्रह ७ नोव्हेंबर रोजी यशस्वीरीत्या अवकाशात पाठवले आहेत.
  • यातील ९ उपग्रह ग्राहक देशाचे असून ते ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा अवकाश केंद्रावरून सोडण्यात आले.
  • ग्राहक देशाच्या उपग्रहात लक्झेमबर्ग व अमेरिका देशाचे प्रत्येकी चार तर लिथुआनियाचा एक उपग्रह आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी कोरोना टाळेबंदी जाहीर केल्यानंतरचे इस्रोचे हे पहिलेच उपग्रह प्रक्षेपण असून याआधी जानेवारीत जीसॅट ३० हा उपग्रह सोडण्यात आला होता.
  • ७ नोव्हेंबर रोजी ३ वाजून १२ मिनिटांनी एकूण दहा उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडण्यात यश आले असून २६ तासांची उलटगणती संपल्यानंतर पीएसएलव्ही C-४९ या ध्रुवीय प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतली. खराब हवामानामुळे उड्डाणास दहा मिनिटे उशीर झाला होता. तसेच प्रक्षेपण मार्गात अवकाश कचरा अचानक आल्याचे कारणही यात होते.
  • ३.३४ वाजता ग्राहकांचे उपग्रह अवकाशातील कक्षेत सोडण्यात आले, नंतर भारताचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपकाच्या चौथ्या टप्प्यातून विलग होऊन कक्षेत स्थापित झाला.
  • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक हा भारतीय अवकाश कार्यक्रमातील विश्वासार्ह प्रक्षेपक असून त्याचे ते ५१वे उड्डाण होते.
  • आतापर्यंत भारताने ३३ देशांचे ३२४ परदेशी उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
  • पृथ्वीनिरीक्षण उपग्रह इओएस ०१ हा प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात सिंथेटिक ॲपर्चर रडारच्या माध्यमातून पृथ्वीचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. त्या उपग्रहाने पाठवलेल्या माहितीतून कृषी, वन, आपत्ती या क्षेत्रात व्यवस्थापन सोपे होणार आहे.
  • अमिरातीमध्ये मुस्लिम वैयक्तिक कायदे शिथिल अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा, मद्यावरील निर्बंध शिथिल करणे आणि तथाकथित ‘ऑनर किलिंग’ हा गुन्हा ठरवणे अशारितीने देशाच्या इस्लामी वैयक्तिक कायद्यामध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे संयुक्त अरब अमिरातींनी जाहीर केले.
  • देशाची कायदा यंत्रणा इस्लामी कायद्यांच्या कठोर अशा अंमलबजावणीवर आधारित असताना, अशा प्रकारच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्तारातून देशाचे बदलते रेखाचित्र प्रतिबिंबित झाले आहे.
  • २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मद्यपान करणे, विक्री व मद्य बाळगणे यासाठी असलेली दंड आकारण्याची तरतूद या बदलान्वये रद्द करण्यात आली आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now