पुरी – शहरभर स्वच्छ आणि सुरक्षित पाणी असणारे देशातील पहिले शहर
- २७ जुलैला सोमवारी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सुजल (drink-from-tap mission) अभियानाची सुरुवात पुरी या प्रसिद्ध देवस्थानी केली.
- या अभियानामुळे पुरी शहरामध्ये सर्व ठिकाणी नळाद्वारे २४ तास स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध राहील.
- हे पाणी पिण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठीसुद्धा वापरले जाऊ शकते.
- जे दिवसभर महानगरपालिकेच्या नळांमधून दर्जेदार पिण्यायोग्य पाणी पुरवतात अशा लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या उच्चभ्रू गटात पुरी सामील झाले आहे.
- यामुळे पुरीमध्ये असणाऱ्या २.५ लाख जनतेला तसेच येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांना थेट नळांमधून सुरक्षित पाणी मिळेल ज्याला पुढे फिल्टर करण्याची गरज पडणार नाही.
- यामुळे प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवण्याची गरज पडणार नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा प्लॅस्टिकचे प्रमाण कमी होण्यामध्ये होईल.
- हे अभियान ओदिशा राज्य सरकारच्या 5 T प्रतिमानाचा (Teamwork, Transparency Technology Transformation, Time) भाग आहे.
- मागच्या पाच वर्षांमध्ये पाणी व्यवस्थापनावरील ओदिशा शासनाचा खर्च २०० कोटींवरून ४००० कोटींपर्यंत गेला आहे.
- पुरीप्रमाणेच ओदिशाच्या इतर शहरांमध्ये अशा सुविधा लवकरच पोहोचविण्यात येतील.
- २०१९मध्ये पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ओदिशा राज्य शासनाने जलसाथी हा उपक्रम सुरू केला होता.
- यामध्ये ५००० स्वयंसेवक महिलांना पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी किट्स देण्यात आली होती.
जलविषयक इतर योजना :
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, २००९
- महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, २०१६-१७
- शिवकालीन पाणी साठवण योजना, २००२
- जलशक्ती अभियान, २०१९ : १ जुलै २०१९ ला सुरू झालेला हा मिशन मोड प्रकल्प असून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये पाणी संवर्धनासाठी राबवण्यात आला. यावर्षी २२ मार्चला (जागतिक जल दिन) या अभियानाचा दुसरा टप्पा Catch the Rain where it falls, when it falls शीर्षकाखाली सुरू करण्यात आला.
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, २००९ याची पुनर्रचना करून १५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना सुरू केली.
- या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत सर्व घरांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल. (हर घर जल)
- जल जीवन मिशन अंतर्गत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर २०१९ ला अटल भूजल योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत २०२०-२०२५ अशा पाच वर्षांसाठी हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या सात राज्यांमध्ये लोकसहभागातून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.