पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्याची पुनर्रचना
- पुणे शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची फेररचना करण्यात आली आहे.
- पूर्वी एकाच अधिकाऱ्याकडे विविध प्रकारचे गुन्हे तपासासाठी येत, परिणामी गुन्ह्याची उकल करण्यास काही मर्यादा येत होत्या.
- वाढत्या सायबर गुन्ह्यांचा विचार करता व कामात सुसूत्रता आणण्यासाठी गुन्ह्याच्या प्रकारानुसार पाच युनिट्स् तयार करण्यात आली आहेत.
- या पाच युनिट्स्सह पोलीस ठाण्याचे कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलीस ठाण्यांना तांत्रिक सहाय्य करणारे कर्मचारी असतील.
क्र. | युनिट | गुन्हे |
1. | हॅकिंग व डेटा चोरी | डेटा इन्स्क्रिप्ट, मेल हॅकिंग, डेटा चोरी, डिजिटल सीगनेजर |
2. | ऑनलाईन बिझनेस फ्रॉड | ओएलएक्स, फ्लिपकार्ट, मल्टि लेव्हल मार्केटिंग, हॅकिंग मोबाईल मनी ट्रान्सफर, ऑनलाईन सेल ॲण्ड परचेस |
3. | चीटिंग फ्रॉड | ऑनलाईन डेटिंग साइट, इन्शुरन्स, जॉब, लोन, पॅकेज टूर, मोबाईल टॉवर, मेट्रीमॉनियल |
4. | सोशल नेटवर्किंग | फेसबुक फेक डॉक्युमेंट, फेसबुक हॅकिंग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ |
5. | एटीएम कार्ड फ्रॉड | मनी ट्रान्स्फर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड, ओटीपी शेअर, मोबाईल, लॅपटॉप चोरी. |
गुन्ह्याची कार्यवाही –
अ. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रक्रारीच्या स्वरूपानुसार त्या-त्या युनिटला पाठवणार.
ब. युनिटचे पोलीस निरीक्षक – पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्यास सूचना देतील.
-
- पोलीस ठाण्यांकडे अर्ज पाठविण्याबाबत व चौकशीनंतर अर्ज दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेक्षण करतील.
क. उपायुक्त – अर्जदाराच्या फसवणुकीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास व तक्रारदार यांची संख्या जास्त असल्यास तपासाबाबत सूचना देतील.