पुणे राज्यातील सर्वात आनंदी शहर

पुणे राज्यातील सर्वात आनंदी शहर

 • देशातील ३४ आनंदी शहरांच्या यादीमध्ये राज्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
 • विशेष म्हणजे, आनंदी शहरांच्या यादीत पुणे शहराने मुंबई आणि नागपूर शहरांना मागे टाकले आहे.
 • देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२व्या स्थानी असून नागपूर १७व्या आणि मुंबई २१व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले.
 • आनंदी शहरांमध्ये लुधियाना अव्वल ठरले असून अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
 • ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ मध्ये आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 • प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ३४ शहरांची ही यादी तयार केली आहे.
 • देशातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी राहणाऱ्या प्रमाणासंदर्भातील माहिती या माध्यमातून प्रथमच समोर आली आहे.
 • वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोयी-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे.
 • विशेष म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा जास्त आनंदी असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
 • देशातील ३४ शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले असून प्रत्येक शहरांतील ४०० जणांचा समावेश केला होता.

आनंदी शहरांची क्रमानुसार यादी

 • लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटना, नागपूर, इंदोर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहाटी, धनबाद, नॉयडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकाता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम्‌, रायपूर

Contact Us

  Enquire Now