पी. सी. महालनोबिस पुरस्काराचे प्रथम वर्ष
- प्रथम पी. सी. महालनोबिस पुरस्कार यावर्षी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. चक्रवर्ती रंगराजन यांना देण्यात आला.
- तसेच प्रा. पी. व्ही. सुखात्मे पुरस्कार यावर्षी डॉ. अरविंद पांडे आणि डॉ. अखिलेशचंद्र कुलश्रेष्ठ यांना देण्यात आला.
- माजी आरबीआय गव्हर्नर रंगराजन यांनी राष्ट्रीय स्थूल उत्पन्न मोजण्यासाठीच्या विविध पद्धतींमधील दोष नाहीसे करण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे चेअरमन म्हणूनही कारभार बघितला आहे.
पी. सी. महालनोबिस :
- पी. सी. महालनोबिस यांचा जन्मदिन २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच त्यांनी दुसर्या पंचवार्षिक योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी त्यांचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमधून पूर्ण केले होते. तसेच त्यांनी भारतीय संख्याशास्त्रीय संस्थेची स्थापना केली. त्यांनी प्लॅनिंग कमिशनसंदर्भात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. १९३३ साली त्यांनी ‘संख्या’ हे मासिक काढण्यास सुरुवात केली. १९६८ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.