पीएम मित्रा पार्क

पीएम मित्रा पार्क

 • नुकतेच, केंद्र सरकारने ग्रीनफील्ड/ब्राऊनफील्ड प्रकल्पांमध्ये एकूण सात पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन आणि अ‍ॅपेरल (पीएम मित्रा) पार्कची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे. २०२७-२८ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीसाठी ४४४५ कोटी रुपयांची तरतूद सदर प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे.
 • भारत सरकार इंटिग्रेटेड टेक्स्टाईल (कापड उद्योग) पार्क (SITP) साठी योजना राबवत आहे जी टेक्स्टाईल प्रकल्पांच्या स्थापनेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवते.
 • सदर पार्क एका विशिष्ट उद्देश वाहन (स्पेशल पर्पझ व्हेइकल)द्वारे विकसित केले जाईल जे खासगी सार्वजनिक भागीदारीमधून केंद्र आणि राज्य शासनाद्वारे स्थापन केले जाईल.
 • प्रत्येक पार्कमध्ये एक उष्मायन केंद्र, सामाइक प्रक्रिया गृह आणि एक सामाइक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र आणि इतर कापड संबंधित सुविधा जसे की डिझाइन केंद्रे आणि चाचणी केंद्रे असतील.

प्रधानमंत्री मित्र योजना

 • सुरुवात – ६ ऑक्टोबर २०२१
 • ही योजना प्रधानमंत्री मेगा टेक्स्टाइल इंटिग्रेटेड टेक्स्टाइल आणि परिधान योजना म्हणूनही ओळखली जाते.
 • या योजनेअंतर्गत देशभरात ७ एकात्मिक वस्त्रोद्योग उद्याने बांधली जातील जेणेकरून सूत, विणकाम, प्रक्रिया, रंगाई आणि छपाईपासून ते कपड्यांचे उत्पादन एकाच ठिकाणी केले जाईल, पूर्वी ही सर्व कामे देशातील विविध राज्यांमध्ये केली जात होती, यामुळे भरपूर  खर्च येत होता, या योजनेमुळे हा खर्च कमी होईल.
 • या योजनेच्या माध्यमातून कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती येईल.
 • ही योजना ५ एफ मॉडेलपासून प्रेरित झालेली आहे, जी फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन अशी आहे.
 • या योजनेद्वारे टेक्स्टाईल पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आकर्षित करेल आणि थेट परकीय गुंतवणूक आणि या क्षेत्रातील स्थानिक गुंतवणुकीला चालना देईल.
 • या योजनेमुळे २१ लाख रोजगार निर्माण होतील. ज्यात ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.
 • ही योजना भारतीय कंपन्यांना जागतिक कंपन्या म्हणून उदयास येण्यास मदत करेल.
 • ह्या योजनेसाठी  सरकारकडून ४४४५ कोटी रुपये खर्च केले जातील.
 • ग्रीन फील्ड पार्क विकसित करण्यासाठी ५०० कोटी खर्च केले जातील.
 • ब्राऊनफील्ड पार्क विकसित करण्यासाठी २०० कोटी खर्च केले जातील.
 • या व्यतिरिक्त, सर्व उत्पादन युनिटला स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी ३०० कोटींची मदत दिली जाईल.

भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र : 

 • भारतातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक.
 • भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ते २.३%, औद्योगिक उत्पादनात ७%, भारताच्या निर्यात कमाईमध्ये १२% योगदान देते आणि एकूण रोजगाराच्या २१%पेक्षा जास्त रोजगार देते.
 • ६% जागतिक वाट्यासह भारत हा तांत्रिक कापडाचा ६वा सर्वात मोठा उत्पादक आहे, तसेच जगातील कापूस आणि तागाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.
 • भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे आणि जगातील ९५% हाताने विणलेले कापड भारतातून येते.

Contact Us

  Enquire Now