पिनाई विजयन

पिनाई  विजयन

जन्म : २५ मे १९४५ (७५ वर्षे)

जन्मठिकाण : पिनराई, मलबार

पक्ष : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

केरळचे १३ वे मुख्यमंत्री (२०१६ पासून)

शपथ : राज्यपाल अरिफ मुहम्मद खान

शिक्षण : बी. ए. (अर्थशास्र)

राजकीय कारकीर्द :

  • केरळ स्टुडंट फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष व सचिव
  • केरळ राज्य महासंघाचे अध्यक्ष
  • केरळ राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष
  • केरळ राज्य विधीमंडळाचे सदस्य : १९७०, १९७७, १९९१, १९९७, २०१६
  • १९९६-९८ : केरळ राज्याचे सहकारमंत्री आणि वीजमंत्री
  • १९९८-२०१५ : भाकप (मा) च्या केरळ राज्य समितीचे सचिव
  • २४ मार्च २००२ पासून भाकपच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य
  • २०१६ : केरळ राज्याचे गृहमंत्री

कार्ये व त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतील केरळ राज्य :

१) भारतात पहिल्यांदाच सत्ताधारी आघाडीची जबाबदारी आणि पारदर्शकता दर्शविण्यासाठी वार्षिक विकासाचा अहवाल सादर केला.

२) ‘नवकेरलम्‌’च्या उभारणीसाठी चार महत्त्वपूर्ण मोहिमा :

अ) जीवन मिशन (Life Mission) – बेघर, भूमिहीन तसेच ज्यांनी घराचे काम सुरू केले मात्र पूर्ण करू न शकणारे यांसाठी

ब) अर्द्रम मिशन (Ardram Mission) – सार्वजनिक आरोग्यासाठी पायाभूत सुविधा

क) हरित केरळ (Harit Keralam) – साक्षरता मिशन, लोकशाही विकेंद्रीकरण आणि लोक नियोजनाच्या धर्तीवर सामूहिकरित्या जलाशयांतून घनकचरा व सांडपाणी वेगळे करणे तसेच आधिकाधिक जमिन लागवडीखाली आणणे.

ड) शिक्षण (Education Mission) – सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणा याअंतर्गत केरळ राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात प्रथम पूर्णपणे डिजीटल राज्य

३) तृतीयपंथियांसाठी : रेल्वे नेटवर्कमध्ये (कोची मेट्रो) रोजगारासाठी आरक्षण देणारे पहिले राज्य, तसेच विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आरक्षण

४) पिंक पेट्रोल (महिला पोलिस पथक) : महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी

५) पहिले पूर्ण विद्युतीकरण झालेले राज्य

६) केरळ बँक तसेच केरळ प्रशासकीय सेवांची सुरुवात

७) केरळ ते मंगरुळ नैसर्गिक वायूची पाइपलाइन काम पूर्ण

सन्मान :

अ) सार्वजनिक व्यवहार निर्देशांकात – सर्वोत्कृष्ट शासित राज्य म्हणून केरळचा गौरव

ब) केरळ राज्याला कॉप्स टुडे इंटरनॅशनलचा २०१७ चा उत्कृष्टता पुरस्कार

क) २०१७ चे ओखी चक्रीवादळ, २०१८ चा निपाहचा उद्रेक, २०१८ व २०१९ मधील पूर तसेच कोविड संकटातील कार्यामुळे पिनाई राजन यांना आपत्ती व्यवस्थापक (Calamity Manager) म्हणून मान

Contact Us

    Enquire Now