पावसामुळे राज्याच्या भूजलपातळीत वाढ
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रात 76 तालुक्यांतील सुमारे 982 गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक वाढली आहे.
- त्यापैकी फक्त 145 गावांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.
- त्यामुळे धरणेही कमी-अधिक प्रमाणात भरली आहेत.
- वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण तसेच सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे त्याचा ताण भूजल साठ्यांवर पडतो.
- अधिक उपशामुळे मराठवाड्यातील 15 तालुक्यातील 90 गावात पाणीपातळी 1 मीटरहून अधिक खोल गेली आहे.
- परिणामी मागील वर्षी 9 हजार 355 गावांना या पातळीत घट झाली.
पर्जन्याचा तुलनात्मक अभ्यास –
अ. सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले तालुके – 258 तालुके
ब. सरासरीच्या तुलनेत पर्जन्यात घट – 67 तालुके
क. या 67 तालुक्यांत सरासरीच्या पर्जन्यमानाच्या तुलनेतील घट – 0-20%