पार्थिव पटेलची निवृत्तीची घोषणा –
- भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवणाऱ्या पार्थिव पटेलने 36वा वाढदिवस तीन महिन्यांच्या अंतरावर असताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
- सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 17 वर्षे आणि 153 दिवसांचे वयोमान असताना कसोटी पदार्पणाची संधी मिळालेल्या पार्थिवने एकूण 65 आंतरराष्ट्रीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. यात 25 कसोटी, 38 एक दिवसीय आणि दोन ट्वेन्टी – 20 सामन्यांचा समावेश होता.
- डावखुरा फलंदाज पार्थिवने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण 1696 धावा केल्या असून यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
- याशिवाय यष्टिरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलत 93 झेल आणि 19 यष्टिचीत असे एकूण 112 बळी मिळवले आहेत.
- पार्थिवने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाकडून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करता आले.
- त्याआधी न्यूझीलंड विरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दौऱ्यावरील खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने रणजी स्पर्धेत पदार्पण केले आणि निवृत्तीपर्यंत त्याने स्थानिक क्रिकेट गाजवले.
- त्याने 194 प्रथम श्रेणी सांगण्यात 27 शतकांसह 11,240 धावा केल्या आहेत. यात 204 ट्वेन्टी – 20 सामन्यांचाही समावेश आहे.
- इंडियन प्रिमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
क्रिकेट प्रकार | सामने | धावा | सर्वोच्च | अर्धशतके | झेल | यष्टिचीत |
कसोटी |
25 |
934 | 71 | 6 | 62 |
10 |
एकदिवसीय |
38 |
736 | 95 | 4 | 30 |
9 |
ट्वेन्टी-20 |
2 |
39 | 26 | 0 | 1 |
0 |