पाट्या ‘मराठीच’
का महत्त्वाचे?
- राज्य मंत्रिमंडळाने १२ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांमध्ये मराठी भाषेतच नामफलक लावणे बंधनकारक आहे.
- मराठी भाषेचे वैभव राखण्यासाठी व भाषेची जपणूक व्हावी या हेतूने १४ ते २८ जानेवारी २०२२ हा पंधरवडा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
नेमके केले गेलेले बदल :
- मराठी नामफलक प्रथम लिहिणे बंधनकारक
- मराठी सोबतच मालक आस्थापनेचा नामफलक इतर भाषांतही लिहू शकतात.
- मराठी नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषातील अक्षरांपेक्षा लहान असू नये.
- मराठी पाट्यांची सक्ती ही दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना लागू होत नसल्याने पळवाट काढली जात होती. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना व (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येईल.
- तसेच कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा दुकानास, बार अथवा रेस्टॉरंट्स्ना महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्यांची नावे देण्यात येऊ नयेत.