पाकिस्तानातील वीज गायब-
- राष्ट्रीय ग्रिडचे योग्य पद्धतीने परिरक्षण न करण्यात आल्याने आणि संरक्षण प्रणाली निकामी झाल्याने शनिवारी पाकिस्तानातील अनेक शहरे अंधारात बुडाली होती.
- वीज निर्मिती व वितरण यंत्रणेत मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.
- उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सरकारी यंत्रणांकडून गैर व्यवस्थापन झाल्याने ही घटना घडल्याचे मान्य केले.
- ‘द सेंट्रल पॉवर जनरेशन कंपनी-गुड्डू’,’नॅशनल ट्रान्स्मिशन अँड डिस्पॅच कंपनी (एन टी डी सी)’ आणि ‘नॅशनल पॉवर कंट्रोल सेंटर (एन पी सी सी)’ या तीन कंपन्या वीज क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत.
- बिघाडामुळे कराची, रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान व अन्य ठिकाणची वीज गायब झाली होती.