पहिल्या मराठी बोलपटाचे नव्वदीत पदार्पण
- मराठीत पहिला बोलपट हा बहुमान लाभलेल्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाचे ६ फेब्रुवारी २०२१ रोजी नव्वदीत पदार्पण झाले आहे.
- व्ही. शांताराम दिग्दर्शित आणि प्रभात फिल्म कंपनी निर्मित हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पहिला बोलपट मानला जातो.
- भारतीय चित्रपटसृष्टीत (‘राजा हरिश्चंद्र’ या ) पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये केली होती पण तो मूकपट होता. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात.
- अयोध्येचा राजा हा चित्रपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला होता. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर, विनायक यांनी या चित्रपटात काम केले होते.
- बोलपट आणि चित्रपटांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरमध्ये व्ही. शांताराम, शेख फत्तेलाल, विष्णुपंत दामले, सीताराम. बी. कुलकर्णी, केशवराव धायबर यांनी एकत्र येत १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. त्यानंतर १९३२ मध्ये कंपनीने त्यांचे मुख्यालय पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओ येथे हलविले.
- या बोलपटात एकूण १५ गाणी असून बोलपटाची कथा राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या पुराणकथेवर आहे.