पहिल्यांदाच भारतात टॉयकॅथॉनचे आयोजन
- देशातील खेळणी बाजारपेठेत भारतीय खेळण्यांना स्थान मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.
- या दृष्टीने भारतीय संकल्पनांवर आधारित खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच टॉयकॅथॉन हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत देशी खेळणी विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांच्या माध्यमातून 23 ते 25 फेब्रुवारी 2021 दरम्यान टॉयकॅथॉन घेण्यात येणार आहे.
- या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ, संशोधन, नवोद्यमींना सहभागी होता येईल.
- या स्पर्धेत सामाजिक आणि मानवी मूल्ये, भारतीय संस्कृती, इतिहास, पर्यावरण, तंदुरुस्ती आणि खेळ अशा पन्नासहून अधिक विषयांवर खेळणी तयार करता येतील. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांनी गौरवले जाणार आहे.
- भारतीय खेळण्याच्या उत्पादनासाठी नवोद्योगांना आर्थिक पाठबळही केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. त्यामुळे देशात खेळणी उद्योग, खेळण्यांचे नवाेद्यमी विकसित होण्यासह स्थानिक अन्य उद्योगांनाही चालना मिळेल.