पश्चिम बंगाल केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे सहावे राज्य
- शेती कायद्यांना सातत्याने होणारा विरोध लक्षात पश्चिम बंगालच्या विधानसभेत केंद्र सरकारच्या तीनही शेतकी कायद्याविरोधात ठराव संमत केला.
- या ठरावास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे.
- पश्चिम बंगाल हे भाजप सरकारने सुरू केलेल्या शेतीविषयक कायद्यांविरुद्ध ठराव मंजूर करणारे सहावे बिगर – भाजपा सत्ताधारी राज्य
यापूर्वी कृषी कायद्याविरोधी ठराव संमत करणारे राज्य
अ) पंजाब
ब) छत्तीसगड
क) राजस्थान
ड) दिल्ली
इ) केरळ