पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेचा युनेस्कोच्या अमूर्त वारसायादीत समावेश

पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेचा युनेस्कोच्या अमूर्त वारसायादीत समावेश

 • संयुक्त राष्ट्र संघाच्या सांस्कृतिक संस्थेने (युनेस्को) मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीत बंगालच्या दुर्गापूजेचा समावेश करण्याची घोषणा केली आहे.
 • १३ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या आंतर-सरकारी समितीच्या १६व्या सत्रात कोलकाता येथील दुर्गापूजेचा समावेश युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधीयादीमध्ये करण्यात आला आहे.
 • २००३ मध्ये कोलकात्याच्या दुर्गापूजेला सांस्कृतिक वारसामध्ये समाविष्ट करण्यासाठीच्या नामांकनास युनेस्कोच्या अनेक सदस्य देशांनी पाठिंबा दिला होता.
 • २०१६ पासून ममता बॅनर्जी सरकार या उत्सवाकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी लाल रोडवर दुर्गा पूजा कार्निव्हलचे आयोजन करत आहे.

दुर्गापूजा

 • नवरात्रोत्सवाच्या पाचव्या रात्रीपासून हा उत्सव सुरू होतो, तर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला संपतो.
 • लोक एकत्रितपणे दुर्गामातेची पूजा करतात आणि आवाहन करतात.
 • तिला विश्वाची स्त्रीऊर्जा अर्थात ‘शक्ती’ असेदेखील म्हटले जाते.
 • यावेळी, लोक एकत्र जमलेल्या पॅडल आणि मंडपांमध्ये देवीच्या क्लिष्ट डिझाइन केलेल्या मातीच्या मूर्तीची पूजा करतात.
 • लोकसंगीत, पाककला, हस्तकला आणि कला परंपरेचे सादरीकरण हे या उत्सवाचे अविभाज्य भाग आहेत.
 • हा उत्सव मूळत: पश्चिम बंगालमधील बंगाली समुदायाचा असला तरी हा सण भारताच्या इतर भागातही उत्साहाने साजरा केला जातो.

अमूर्त वारसा : यात पुढील गोष्टींचा समावेश होतो-

 • पूर्वजांकडून वारशाने मिळालेल्या परंपरा किंवा जिवंत अभिव्यक्ती आणि मौखिक परंपरा, पर्फॉर्मिंग आर्ट्स, सामाजिक प्रथा, विधी, ज्ञान आणि निसर्ग आणि विश्वाशी संबंधित सामाजिक प्रथा, विधी, उत्सवाचे कार्यक्रम पद्धती किंवा पारंपरिक हस्तकला तयार करण्याचे कौशल्य इ.

भारतातील युनेस्कोच्या यादीत समावेश असलेले घटक

 • मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी सूचीमध्ये सध्या ४९२ घटक असून भारतातील पुढील १४ नोंदींचा समावेश आहे-
१) दूर्गापूजा (कोलकाता), २०२१
२) कुंभमेळा, २०१७
३) नौरोज, २०१६
४) योगा, २०१६
५) जादियाला गुरू (पंजाब),  २०१४
६) संकीर्तना (मणिपूर), २०१३
७) बौद्ध जप (लडाख), २०१२
८) छाऊ नृत्य २०१०
९) कालबेलिया नृत्य (राजस्थान), २०१०
१०) मुदियेट्टू (केरळ), २०१०
११) राममन उत्सव (गढ़वाल), २००९
१२) कुट्टीयम संस्कृत थिएटर, २००८
१३) रामलीला, २००८
१४) वैदिक जप, २००८

अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत २०२१ मध्ये समाविष्ट घटक

 • अरबी कॅलिग्राफी, उझबेकिस्तानची बक्शी कला, काँगोली रूंबा, फाल्कनरी, डेन्मार्कचे इनुइट ड्रम नृत्य आणि ट्रफल हंटिंग आणि एक्स्ट्रक्शनचे पारंपरिक इटालियन ज्ञान आणि सराव.

Contact Us

  Enquire Now