परस्सला बी. पोन्नम्मल
परस्सला बी. पोन्नम्मल
जन्म : २९ नोव्हेंबर १९२४ (परस्सल, केरळ)
निधन : २२ जून २०२१ (वय ९६ वर्षे)
भारतीय कर्नाटकी संगीतकार
- सेमंगुडी श्रीनिवास अय्यर, मुथय्या भागवतार आणि पापनासम शिवन यांच्या वंशातील एक कर्नाटकी शास्त्रीय गायिका.
- मूळचे कर्नाटक संगीत जपणाऱ्यांपैकी एक होत्या.
- शिक्षण : १९३९ मध्ये सुरू झालेल्या स्वाती तिरुनाल म्युझिक कॉलेज (तिरुवनंतरपुरम) मधील पहिल्याच बॅचची पोन्नमल ही एकमेव मुलगी.
- आधुनिक संस्थेत जाऊन कर्नाटक संगीत शिकून गानभूषण, गानप्रवीण पदवी मिळवणार्या केरळमधील पहिल्या महिला.
कार्ये :
i) आरएलव्ही ॲकॅडमी ऑफ म्युझिक या संस्थेत गानगुरू म्हणून स्थान.
ii) कर्नाटकी संगीतातील मोठा उत्सव नवरात्री संगीत उत्सवात महिलांना २००६ पर्यंत संधी दिली जात नसे, जी पंरपरा वयाच्या ८२ व्या वर्षी या उत्सवात गाऊन पोन्नमल यांनी मोडकळीस आणली व महिला कलावंतांना या उत्सवात स्थान मिळवून दिले.
iii) पुरुष श्रेष्ठत्वाची पोकळ भिंत मोडून केरळच्या कर्नाटक संगीतात एकच नव्हे तर अनेक कवाडे महिलांसाठी त्यांनी खुली करून दिली.
गायिकेचे वैशिष्ट्ये : शुद्ध शब्दोच्चार, पक्के सूर, एकही मात्रा इकडे-तिकडे न करता भाव पोहोचवण्याची समज.
पुरस्कार :
अ) २००८ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
ब) २००९ – स्वाती संगीत पुरस्कार (केरळ राज्य सरकार)
क) २०१० – केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार
ड) २०१२ – संगीत प्रभाकर पुरस्कार
इ) २०१७ – पद्मश्री