पंतप्रधान मोदी यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ पुरस्कार
- भारत-अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लिजन ऑफ द मेरिट’ हा पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला. (21 डिसेंबर 2020).
- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
- हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखालाच वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो.
- ओब्रायन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक शक्ती म्हणून उदयास आणले तसेच भारत व अमेरिका दोन्ही देशांनी जागतिक आव्हानाला तोंड देण्यातील भागीदारी पुढे नेली.
- ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना सामूहिक सुरक्षेची आव्हाने पेलल्याबद्दल तर जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अंबे यांना मुक्त हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेतील प्रगतीसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता.
- आतापर्यंत मोदींना मिळालेले पुरस्कार –
दिनांक देश/संस्था पुरस्काराचे नाव
3 एप्रिल 2016 सौदी अरेबिया ऑर्डर ऑफ अब्दुलअझीझ अल सौद
4 जून 2016 अफगाणिस्तान स्टेट ऑडर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान
10 फेब्रुवारी 2018 पॅलेस्टाईन ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन
26 सप्टेंबर 2018 संयुक्त राष्ट्रसंघ चॅम्पियन ऑफ द अर्थ
24 ऑक्टोबर 2018 दक्षिण कोरिया सेऊल शांतता पुरस्कार
4 एप्रिल 2019 संयुक्त अरब अमिरात झायेद मेडल
12 एप्रिल 2019 रशिया सेंट एंड्रयू ॲवॉर्ड
8 जून 2019 मालदीव ऑर्डर ऑफ डिस्टींविश्ड रूल ऑफ निशाण इझुद्दीन
24 ऑगस्ट 2019 बहरीन किंग हमाद ऑर्डर ऑफ द रीजिसंस
24 सप्टेंबर 2019 बिल अँड मिलिंडा गेटस् फाऊंडेशन ग्लोबल गोल कीपर्स