पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र व राज्या मध्ये समन्वयासाठी आवाहन-
- निती आयोगाच्या बैठकीत देशाचा वेगाने विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये व्यापक समन्वयाचा आग्रह पंतप्रधान मोदींनी धरला.
- तसेच आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खासगी क्षेत्राच्या प्रोत्साहनाला केंद्र व राज्य सहकार्य करावे अशी साद ही त्यांनी घातली.
- निती आयोगाच्या या बैठकीमध्ये पश्चिम बंगाल व पंजाबचे मुख्यमंत्री सोडून बाकी सर्व मुख्यमंत्री उपस्थित होते.
- नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर ही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
- मोदींनी सांगितले की आपण 65 हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. जर शेतकऱ्यांनी तेलबियांचे उत्पादन वाढवले तर हेच आहे त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करता येतील त्यामुळे शेतकऱ्यांना तेलबियांची लागवड करण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे.
- स्पर्धात्मक सहकारी संघराज्य वाद हा देशाचा प्रगतीचा आधार आहे. त्यासाठी जुनाट व कालबाह्य कायदे रद्द करणे गरजेचे आहे.
- आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून अधिकाधिक संधी उपलब्ध करून गरजेपुरतेच नव्हे तर जगासाठी उत्पादन करावे यासाठी प्रोत्साहन देणे.