पंतप्रधानांच्या हस्ते प्रस्तावित संसद भवनाचे भूमिपूजन
- १० डिसेंबर गुरुवारी संसदेच्या नव्या इमारतीची कोनशिला व भूमिपूजन समारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला. विविध पक्ष नेते, मंत्री व अनेक देशांचे राजदूत या कार्यक्रमास उपस्थित होते.
- नवीन इमारतीचे क्षेत्रफळ ६४,५०० m२, असेल.
- भारतीय लोकशाहीचा वारसा प्रदर्शित करण्यासाठी, ‘संविधान सभागृह’, ग्रंथालय, समित्यांसाठी खोल्या इ. तरतूद करण्यात आली आहे.
- नवीन इमारतीचे बांधकाम (टाटा Projects ने हाती घेतले आहे) २०२२ सालांपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- लोकसभेच्या सभागृहात ८८८ तर राज्यसभेच्या सभागृहात ३८४ सदस्यांची आसनक्षमता असेल.
- संयुक्त बैठकीदरम्यान लोकसभेच्या सभागृहाची क्षमता १२२४ आसनांपर्यंत वाढवण्यात येईल.
संसद भवन (भारत)
- चालू संसद भवनाचे बांधकाम १९२१ साली सुरू झाले होते व १९२७ साली पूर्ण होऊन ते भवन कार्यरत झाले.
- संसद भवनाची सध्या पूर्ण आसनक्षमता ७९० असून लोकसभेसाठी आता (५४३) व राज्यसभेसाठी (२४५)
- कलम ८० राज्यसभेसाठी कमाल सदस्यसंख्या २५० निश्चित केली आहे.
- कलम ८१ राज्यसभेसाठी कमाल सदस्यसंख्या ५५२ निश्चित केली आहे.
- लोकसभेत व राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात पण १०४ त्या घटनादुरुस्तीने फक्त SC व ST जागांसाठी आरक्षण वाढवण्यात आले आहे व अँग्लो इंडियन्ससाठी राखीव जागा बरखास्त करण्यात आल्या आहेत.